विजयकुमार भोसले यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे नवनिर्वाचित प्रदेश सचिव पदी निवड

141

✒️कुंभोज(पुरोगामी न्युज नेटवर्क)

कुंभोज(दि.24सप्टेंबर):- ता. हातकलंगले येथील माननीय विजयकुमार भोसले यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे नवनिर्वाचित प्रदेश सचिव पदी निवड झाल्याने कुंभोज परिसरात शुभेच्छांचा वर्षाव होत आहे स्वतःसाठी नाही तर बहुजनासाठी 25 वर्ष राजकीय पदावर असताना अहंकाराचा ‘अ’देखील ज्यांनी मनाला स्पर्श करू दिला नाही.

तसेच काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते सामाजिक धार्मिक राजकीय शैक्षणिक बहुजनांचा नेता कुंभोज गावचे सुपुत्र माजी प्रभारी सातारा जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे माननीय श्री विजयकुमार भास्कर भोसले यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभागाचे नवनिर्वाचित प्रदेश सचिव पदी निवड झाली.

या नियुक्तीचे पत्र आखिल भारतीय काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.राजेश लिलोठिया, माजी मंत्री डॉ.नितीन राऊत, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष मा.आ.नानासो पटोले, माजी मंत्री सतेज उर्फ बंटी ,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग प्रदेशाध्यक्ष मा.सिध्दार्थ हत्तीअंबीरे मा. राजेश लाडे ,मा. संजय वाघमारे, मा. पी.एन.पाटील, यांचे सहकर्य लाभले