ज्योती सावित्री नागरी सहकारी पतसंस्था ब्रम्हपुरी येथे वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

175

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.25सप्टेंबर):- दिनांक 24/09/2023 रोज रविवार दुपारी 1.30 वाजता ज्योती सावित्री नागरी सहकारी पतसंस्था ब्रम्हपुरी ता.ब्रम्हपुरी जि.चंद्रपूर ची वार्षिक सर्वसाधारण सभा ज्योती सावित्री परिसर शिवाजी नगर खेड रोड ब्रम्हपुरी येथे पतसंस्थेचे अध्यक्ष मा.श्री शेंडे सर यांचे अध्यक्षतेखाली , पतसंस्था संस्थापक तथा मार्गदर्शक मा.श्री प्रा.जेंगठे सर,श्री मोहूर्ले सर,श्री देशकर सर, श्री. नागरीकर सर, पतसंथा इतर संचालक यांचे प्रमुख उपस्थितीत तसेच पतसंस्थेचे तालुक्यातील इतर बहुसंख्य मान्यवर सभासद यांचे उपस्थितीत मा.श्री लांजेवार साहेब यांचे शुभ हस्ते फुले दाम्पत्य यांचे पुतळा व फोटो प्रतिमा यांना पुष्पहार अर्पण करून फुले दाम्पत्य यांचा मोठ्या उत्साहात जयघोष करून नियोजित सभा पार पडली.

त्यात समाजातील विशेष मौलिक कार्य करणाऱ्या चि. नितीन मोहूर्ले कोंढाळा (वडसा) शास्त्रज्ञ व चि. अमोल मोहुर्ले वायगाव BSc व MSc गणित विद्यापीठ टापर युवकांचा जाहीर सत्कार करण्यात आला.या प्रसंगी श्री रामलाल वि.लांजेवार सर (से. नि.व.स.)पिंपळगाव (भोसले) ह. मु.नवेगाव/बांध जि.गोंदिया यांचे कडून स्व.बाबा विठोबा व आई गंगाबाई यांचे स्मरणार्थ आदरणीय फुले दाम्पत्य यांची एकत्रित फोटो पतसंस्थेला मा. श्री शेंडे अध्यक्ष यांचे शुभ हस्ते सस्नेह भेट देण्यात आली.