बाभुळगाव येथील शेतकरी आज पण जगताहेत आहेत स्वतंत्र पूर्व आयुष्य !…

305

🔸अण, काय तो चिखल !…अण, काय तो शेत रस्ता !…

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी.पाटील)

धरणगाव(दि.25सप्टेंबर):-तालुक्यातील बाभुळगाव येथील शेतकरी आज सुद्धा जगताहेत स्वतंत्र पूर्व आयुष्य. बाभुळगाव येथील शेती शिवारात आज पर्यंत एक सुध्दा रस्ता हा झालेला नसून येथील शेतकऱ्यांच्या आयुष्याशी प्रशासन हे खळत आहे. बाभुळगाव – ते भामर्डी बाभूळगाव ते उखळवाडी या मुख्य शेती रस्त्यांची अत्यंत दयनीय व क्रूर अशी अवस्था झालेली आहे. विशेष म्हणजे हा रस्ता एकदा सुध्दा बनलेला नाही. बाभुळगाव शेती शिवाराचा एक सुध्दा रस्ता आज पर्यंत झालेला नाही आहे. असे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु असून शेतीची महत्वाची कामे करण्यासाठी शेतात जाण्यासाठीच रस्ता नसल्याने अडचणीचा सामना हा करावा लागत आहे.

बाभुळगाव येथील शेतकरी बांधवांना शेतात कोणते पीक घ्यायचे हे शेतीच्या दृष्टीने नाही तर रस्त्याच्या दृष्टीने ठरवावे लागते. त्याच्या परिणाम हा शेतीच्या उत्पन्नावर होत आहे. त्यामुळे येथील शेतकरी आर्थिक दृष्ट्या दुर्बल होत आहेत. शेतात लावलेल्या पिकांना फवारणी व खत देण्यासाठी बैलगाडे रस्ता अभावी शेती पर्यंत जात नसल्यामुळे पिकांना वेळेवर खत, फवारणी न मिळाल्यामुळे त्याचे परिणाम उत्पन्नावर होऊन शेतकरी अधिक कर्जबाजारी होत आहे. राहिला साहीला पिकवलेला मालाचां प्रेश्न तर तो माल घरी आणायचा कसा हा दिखील मोठा प्रश्न येथील शेतकरी बांधवांना पडत आहे.

शेत रस्त्याच्या दयनीय अवस्था मुळे शेतकरी बांधवांना मधून लोक प्रतिनिधी व प्रशासना विषयी नाराजीचा सुर निघत आहे. जळगाव ग्रामीण मतदार संघाचे आमदार,मंत्री ना. गुलाबरावजी पाटील साहेबांच्या पुX र्ण मतदार संघात गावो गावी कामाचा धडाका सुरू आहे.

 त्यामुळे त्यांचे ग्रामस्थांमधून कौतुक देखील होताना दिसत आहे. मा. ना. गुलाबरावजी पाटील साहेबांनी लक्ष घालून हे काम देखील मार्गी लावावे असा सुर ग्राहमस्थांमधून निघत आहे. प्रशासनाने लक्ष देऊन बाभुळगाव येथील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवावा असे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले. बाभुळगाव येथील शेत रस्त्याचा प्रश्न लवकरात लवकर प्रशासनाने व लोकप्रतिनीधींनी मार्गी लावावा. अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.