आठवले समाजकार्य महाविद्यालयात कॅम्पस इंटरव्यु

152

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.25सप्टेंबर):- आठवले समाजकार्य महाविदयालयात, कर्मयोगी कन्सलटन्सी सर्व्हिसेस प्रा.लि व आठवले समाजकार्य महाविद्यालय यांचे संयुक्त विदयमाने, आदिवासी योजनांचे मुल्यमापन कार्यक्रमा करीता मुलाखत निवड प्रक्रिया प्राचार्याच्या निर्देशानुसार हा कार्यक्रम राबविण्यात आलेला आहे.

या मुलाखत निवड प्रक्रिये करीता महाविदयालयाचे एकूण 40 माजी विद्यार्थी उपस्थित होते. सर्वांनी मुलाखत दिलेल्या आहेत, यामधून 10 विदयार्थ्याची निवड करण्यात आलेली आहे.

आदिवासींच्या मुल्यमापन कार्यक्रमा करिता कर्मयोगी कन्सलटन्सी सर्व्हिसेस प्रा.लि. अमरावती ही संस्था गोदिया, नागपूर, चंद्रपूर गडचिरोली इ. जिल्हया मध्ये कार्य करीत आहे. व यासारखे विविध कार्यक्रमां करिता साधन व्यक्तीची नियुक्ती करण्यासाठी आठवले समाजकार्य महाविदयालयातील बि.एस डब्लू व एम. एस डब्लू प्रशिक्षन घेतलेल्या मुलांची मुलाखत घेऊन त्यांची निवड करण्यात आलेली आहे.

या निवड समिती मध्ये. आठवले समाजकार्य महाविदयालयाचे प्राध्यापक डॉ. सुरेश मिलमिले. चंदनस्पर्श अॅलमनाई संघटनेचे सचिव हे विषय तज्ञ म्हणून ‘उपस्थित होते. तर टिम लिडर म्हणून श्री ऋषिकेश सं वरटकर (माहिती संकलन तज्ञ मुलाखत कर्ता ) व ग्रुप लिडर श्री प्रतिक सु कोकोटे (माहिती संकलन तज्ञ नोंदिकर्ता व कर्मयोगी कन्सलटन्सी सर्व्हिसेस प्रा लि. अमरावती या संस्थेचे संचालक श्री भालचंद्र गांवडे उपस्थित होते. यांच्या उपस्थितीत मुलाखत व निवड’ प्रक्रीया पूर्ण करण्यात आली.