पुसद शहरात समनक जनता पक्षाचे रास्ता रोको आंदोलन

88

🔹कंत्राटीकदारांना दिलेले परवाने त्वरीत रद करा::!!

✒️बळवंत मनवर(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.27सप्टेंबर):-शाळेच्या कंत्राटीकरणाचा व सरकारी नोकरभरती खाजगी संस्थांच्या माध्यमातून करण्याचा निर्णय तत्काळ रद्द करण्याच्या मागणीसाठी समनक जनता पार्टीच्या वतीने मंगळवारी 26 सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक पुसद येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्याची प्रमुख मागण्या सरकारी शाळा व उद्योगपतींना विकण्याचा निर्णय तात्काळ रद्द करावा.

खाजगी कंपन्यांच्या माध्यमातून सरकारी नोकरीचा निर्णय तात्काळ रद्द करा शिक्षणाचे राष्ट्रीयकरण करा युपीएससी परीक्षा न घेता हुकूमशाही पद्धतीने केलेल्या आय.ए.एस दर्जाच्या नियुक्तीया तत्काळ रद्द करा आमदार आणि खासदारांची पेन्शन रद्द करून कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करा आणि शेतकऱ्यांना सुद्धा पेन्शन लागू करा अशा प्रमुख मागण्या आंदोलन दरम्यान मागण्यात आल्या.