बनपिंपळा ग्रामपंचायतच्या सरपंचपदी नवनाथ पाळवदे यांची निवड

202

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनीधी)

गंगाखेड(दि.2ऑक्टोबर):-तालुक्यातील बंनपिपळा ग्रामपंचायतच्या सरपंचपदी नवनाथ पाळवदे यांची (दि.29 सप्टेंबर शुक्रवार) रोजी बिनविरोध निवड करण्यात आली बनपिंपळा ग्रामपंचायतच्या तात्कालीन सरपंच संगीता इंद्रजीत कोरके यांनी अडीच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केल्याने दिनांक 8 सप्टेंबर रोजी राजीनामा दिला होता रिक्त झालेल्या सरपंच निवडीसाठी शुक्रवार दि.29 सप्टेंबर रोजी ग्रामपंचायतच्या सभागृहामध्ये विशेष सभा बोलावण्यात आली.

यावेळी सरपंच पदासाठी नवतरुण ग्रामपंचायत सदस्य असलेले नवनाथ तुकाराम पळवदे यांचा एकमेव अर्ज आल्याने पिठासीन अधिकारी पी.पी.राठोड यांनी सरपंचपदी नवनाथ तुकाराम पाळवदे यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले

ग्रामसेवक डी एन राठोड यांनी त्यांना सहकार्य केले याप्रसंगी उपसरपंच पांडुरंग उत्तमराव मलगीर, माजी सरपंच संगीता इंद्रजीत कोरके, सदस्य काशीबाई सूर्यकांत कांबळे, रामभाऊ गुणाजी कांबळे यांची उपस्थिती होती तर सत्यभामा महादेव कोरके व सुनंदा गणेशराव पाळवदे या दोन सदस्यांची अनुपस्थिती होती नवनाथ पाळवदे यांची सरपंचपदी निवड झाल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.