जि.प.शाळा थोरगव्हाण येथे महात्मा गांधी व लाल बहादुर शास्री जंयती साजरी

237

✒️विशेष प्रतिनिधी(निलेश पाटील)

जळगाव(दि.2ऑक्टोबर):-यावल तालुक्यातील जि.प.शाळा थोरगण्हान येथे महात्मा गांधी व लाल बहादुर शास्री जंयती साजरी करण्यात आली.प्रसंगी शाळा व्यवस्थान समितिचे अध्यक्ष समाधान चौधरी , माजी अध्यक्ष विनोद भालेराव उपाध्यक्ष दिपक शिमरे व प्रमुख पाहुणे गावाचे पोलीस पाटील गजानन चौधरी व सर्व पालक वर्ग व शिक्षक यांच्या समक्ष जंयती साजरी करण्यात आली.

कार्यक्रम प्रसंगी राष्टपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्री यांचे जिवन चरित्र व त्याच कार्य हे शिक्षकांनी समजून दिले. तसेच शालेय परिसर स्वच्छ करून स्वच्छता दिन ही साजरा करण्यात आला स्वच्छतेचे महत्व समाधान सोनवने यांनी वि.ना समजून सांगीतले .

याप्रसंगी शाळेचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष समाधान चौधरी, उपाध्यक्ष दिपक शिमरे सदस्य विनोद पाटील, समाधान सोनवने, पोलीस पाटील गजानन चौधरी , विनोद भालेराव व सर्व सदस्य, अंगनवाडी सेविका , गावातील सर्व माता व पालक वर्ग , ग्रामपंचायतील सरपंच व सर्व सदस्य ,मुख्याध्यापक महेंद्र देवरे, एकनाथ सावकारे , निलेश पाटील, उपस्थित होते. शेवटी विद्यार्थ्याना बिस्कीट ,चॉकलेट देऊन तोंड गोड करण्यात आले. सर्व शालेय कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार निलेश पाटील यांनी मानले.