परिवर्तन कला महासंघाचे एक तास स्वच्छतेसाठी

135

✒️बळवंत मनवर(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.3ऑक्टोबर):-महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसर ते बसस्थानक परिसरापर्यंत स्वच्छतावर आधारित गाणीगात परिसरातील केर कचरा झाडून स्वच्छ करत राष्ट्रीय अभियानातून संदेश दिला आहे.

वाशिम परिवर्तन कला महासंघाचे जिल्हा अध्यक्ष शाहीर शेषराव मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला सामाजिक कार्यकर्ते पी.एस.खंदारे यांच्या हस्ते पुष्पहार घालून स्वच्छता अभियानाला सुरुवात झाली डा.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर ते बसस्थानक परिसरापर्यंत परिवर्तन कला महासंघाचे वतीने एक तास श्रमदान करून स्वच्छता केली.

या मध्ये शेषराव मेश्राम, शाहीर दतराव वानखेडे,पी.एस.खंदारे, सिनेकलावंत अरविंद उचित, आंबेडकरी चळवळीतील जेष्ठनेते नारायण मिटकरी शाहीर प्रकाश अंबेकर, शाहीर सदाशिव राऊत, सुभाष वाठोरे, शाहीर लोडजी भगत,कवी सुरेश शृंगारे, जिजाबाई घनघावकर, मथुराबाई दतराव वानखेडे, मधुकर ताजणे,कुशल आवटे, नामदेव आवटे,नाथा धाबे, पंचफुला सरकटे, आनंदीबाई सरकटे, कांताबाई सरकटे,मंजुळाबाई धाबे,अनिता ताजणे, सिद्धार्थ भगत, नारायण इंगोले, प्रकाश सरकटे,सिंधुबाई सरकटे, वसंत सरकटे चतुराबाई भगत, पंचफुला रोकडे,लिलाबाई कांबळे आदीनी सहभागी झाले होते.