युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या युवा आघाडी तालुका अध्यक्षपदी आतिश वटाणे यांची निवड

119

✒️ सिध्दार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड (दि. 7 ऑक्टोबर):- तालुक्यातील बाळदी येथील रहिवासी असलेले ग्रामीण क्षेत्राशी नाळ जोडून सतत सामाजिक कार्यात कार्यरत असणारे पत्रकार अतिश वटाणे यांची युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यांनी त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना उमरखेड तालुक्याच्या युवा आघाडी तालुका अध्यक्षपदी नियुक्तीपत्र देऊन निवड केली.

गोरगरीब, शेतमजूर अन्यायाला वाचा फोडण्यासाठी तसेच पत्रकाराच्या पाठीमागे खंबीर उभे राहण्यासाठी ही संघटना मोठ्या प्रमाणात काम करत आहे.

अशीच कार्य आपल्या हातून घडावी अशी गणेश कचकलवार सर म्हणाले याच वेळी नियुक्तीपत्र मिळताच पत्रकार मंडळीकडून अतिश वटाणे यांच्यावर अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

यावेळी अतिश वटाणे म्हणाले ती जी जबाबदारी माझ्यावर राष्ट्रीय अध्यक्षांनी दिली ती चांगल्या प्रकारे पार पाडून अन्यायाविरुद्ध न्याय देण्याचा प्रमाणिक प्रयत्न करीन आणि यावेळी राष्ट्रीय अध्यक्षांचे आभार मानले.