राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा-विजेत्यांना पारितोषिक, बालकदिनी निकाल

653

✒️नाशिक(पुरोगामी न्युज नेटवर्क)

नाशिक(दि.8ऑक्टोबर):- शिक्षक ध्येय आणि आगरकर विद्या भवन, हिंगणघाट, जिल्हा वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ‘ऑनलाइन चित्रकला स्पर्धा – २०२३’ साठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर या स्पर्धेचे आयोजन केले असून विद्यार्थ्यांना चित्र काढण्यासाठी प्रोत्साहन देणे, त्यांच्या कलेचे कौतुक करणे हाच या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे.

राज्यातील विद्यार्थ्यांमधून तीन गटात ही ऑनलाइन चित्रकला स्पर्धा घेतली जाणार आहे.

अ गट (इयत्ता पहिली ते पाचवी)
ब गट (इयत्ता सहावी ते दहावी)
क गट (इयत्ता अकरावी ते पदवी)

विद्यार्थ्यांमध्ये विविध प्रकारच्या कला असतात, त्यातील एक कला म्हणजे ‘चित्रकला’ होय. सुंदर, सुबक चित्र काढणाऱ्या विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांच्या कलेला उत्तेजन देणे, त्यांची सुप्त कला राज्यातील इतर विद्यार्थ्यांसमोर आणणे, त्यांचे कौतुक करून, प्रोत्साहनासह त्यांच्यातील कलाकार वृत्ती वाढीस लावणे हाच या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे.

ऑनलाइन चित्रकला स्पर्धेच्या अधिक सविस्तर माहितीसाठी विद्यार्थ्यांनी
https://shikshakdhyey.co.in

https://kaushalyavikas.blogspot.com

या संकेतस्थळांना आजच भेट द्यावी.

गट अ चे विषय आहेत… (फक्त एकाच विषयावर चित्र काढायचे आहे.)
१. पतंग
२. फुलपाखरू
३. फुगा
४. फुलदाणी

गट ब चे विषय आहेत… (फक्त एकाच विषयावर चित्र काढायचे आहे.)
१. माझा आवडता पक्षी
२. माझी शाळा
३. निसर्ग चित्र
४. परी

गट क चे विषय आहेत… (फक्त एकाच विषयावर चित्र काढायचे आहे.)
१. माझा आवडता प्राणी
२. झेंडा वंदन
३. गावची जत्रा
४. माझा आवडता सण

चित्र पूर्ण झाल्यानंतर त्या चित्राचा मोबाईलमध्ये एक छानसा फोटो काढायचा आहे. तो फोटो आम्हाला माहिती सह आमच्या

shikshak.dhyey@gmail.com

या ईमेल आयडी वर पाठवायचा आहे.

ई मेल करता येणे शक्य नसल्यास वरील सर्व माहिती व फोटो आपण 9623237135 या व्हॉट्सॲप नंबरवर पाठवायचा आहे.

रंगविलेले चित्राचा फोटो जमा करण्याची अंतिम तारीख ३१ ऑक्टोबर २०२३ आहे.

तीनही गटातील उत्कृष्ठ चित्रांना पारितोषिक दिले जाईल. त्यात सन्मानचिन्ह (ट्रॉफी) आणि प्रिंट प्रशस्तीपत्र (सर्टिफिकेट) + शिक्षक ध्येयचे प्रिंट मासिके यांचा समावेश आहे.

तसेच या स्पर्धेतील सर्व सहभागी विद्यार्थ्यांना डिजिटल सहभाग प्रमाणपत्र आणि शिक्षक ध्येयचे ५१+ डिजिटल अंक व्हॉट्सॲप नंबरवर किंवा ई मेल वर पाठविण्यात येईल.

उपक्रमासंबंधी काही अड़चण किंवा शंका असल्यास, अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी
https://shikshakdhyey.co.in

या वेबसाइटला भेट द्यावी.

राज्यातील मुख्याध्यापक तसेच चित्रकला शिक्षक यांनी प्रार्थनेच्या वेळी किंवा वर्गात सर्व विद्यार्थ्यांना स्पर्धेविषयी सविस्तर माहिती द्यावी आणि सकारात्मक विचारसरणी ठेऊन या स्पर्धेत आपल्या विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदवावा, असे आवाहन आगरकर विद्या भवन, हिंगणघाट, जि. वर्धा आणि ‘शिक्षक ध्येय’चे मधुकर घायदार, नाशिक; प्रभाकर कोळसे, मिलिंद दीक्षित, वर्धा; श्री. डी. जी. पाटील, विजय अहिरे, नंदुरबार; मंजू वानखडे, अमरावती; कविता चौधरी, भाग्यश्री पवार, जळगाव; कैलास बडगुजर, ठाणे; एस. जी. पाटोदेकर, लातूर; खुशाल डोंगरवार, भंडारा; वसुधा नाईक, पुणे; संगीता पवार, मुंबई; अश्विनी दिक्षीत, संगीता म्हस्के, पुणे; महादेव शरणप्पा खळूरे, लातूर, प्रेमजीत गतीगंते, मुंबई; डॉ. अर्चना झाकडे, उल्केशकुमार वाळूंजे, छत्रपती संभाजीनगर; डॉ. माधव गावीत, नाशिक आदींनी तसेच संपूर्ण संपादकीय मंडळातर्फे करण्यात आले आहे.