चलो बुद्ध धम्म की ओर अभियानचे प्रणेते ॲड.शिवराज कोळीकर यांचा सत्कार

71

✒️बदलापूर(पुरोगामी न्युज नेटवर्क)

बदलापूर(दि.9ऑक्टोबर):- चलो बुद्ध धम्म की ओर अभियानाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.शिवराज कोळीकर नांदेड यांनी गेल्या 30-32 वर्षापासून 40 हजार पेक्षा जास्त मातंग, भटके विमुक्ते समाजातील लोकांना धम्मदीक्षा देण्याचं महान कार्ये पार पाडले आहे. त्यांच्या या धम्मकार्याचा उचित गुण गौरव आणि भव्य सत्कार बदलापूर येथील सर्व निष्ठावंत बौद्ध जनांच्या वतीने ॲड.शिवराज कोळीकर यांना सन्मानपत्र, स्मृती चिन्ह, शाल, गौरवनिधी व पुष्गुच्छ देवून सत्कार करण्यात आला.

बदलापूर येथील क्रांतिकारी आंबेडकर विचारांचे जेष्ठ कामगार नेते धम्म उपासक वाय.आर.लोंढे यांच्या अध्यक्षतेखाली बदलापूर येथे म्हसकर गुप्ते हॉल पहिला माळा, घोरपडे चौक बदलापूर येथे संपन्न झाला.बदलापूर येथील पूज्यनीय भंतेजी महेंद्रबोधी यांनी उपस्थित जनसमुदायाला त्रिशरण, पंचशील देवुन थोडक्यात धम्म देशना देवुन कार्यक्रमाची सुुरवात झाली.
या वेळी प्रमूख मान्यवर आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ नेते, फुले-आंबेडकर विचाराचे भाष्यकार सुरेश केदारे, पत्रकार, साहित्यिक, कामगार नेते सागर तायडे, भारतीय बौद्ध महासभा केंद्रीय शिक्षक बी. एल. सावंत, वंचित बहुजन आघाडी बदलापूर महिला शहर अध्यक्षा काजलताई यादव,भवतु सब मंगलमचे धम्म प्रचारक शांतु डोळस,घाटकोपर रिपाई नेते तालुका अध्यक्ष राजाभाऊ गांगुर्डे, सत्कार मूर्ती ॲड.शिवराज कोळीकर यांच्या पत्नी आयु. वंदनाताई कोळीकर, मान्यवरांनी विचारमंचावर चलो बुद्ध धम्म की ओर अभियानचे प्रणेते ॲड.शिवराज कोळीकर यांच्या धम्म प्रचार व धम्म दीक्षा कार्याबाबत गुणगौरव उद्गार काढून मार्गदर्शन केले. यावेळी ॲड.शिवराज कोळीकर सत्कार संयोजन समितीचे बदलापूर विभागातील सर्व पदाधिकारी, सल्लागार, निमंत्रक रामदास पहुरकर, ज्ञानेश्वर गोतावळे, विजय निकम, संजय कांबळे, जसकेतन आर्यासह सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

सत्कार संयोजन समितीचे उपाध्यक्ष महेंद्रकुमार मिसळे यांनी सर्व उपस्थित जनसमुदायाला भोजनदान दिले. सत्कार संयोजन समितीचे प्रमुख सल्लागार अन् महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी गायक मास्टर राजरत्न राजगुरु स आणि इंगळेजी, डॉ.नंदकुमार कांबळे यांनी आपल्या पहाडी आवाजात क्रांतिगीते सादर केली.
सत्कार संयोजन समितीचे निमंत्रक रामदास पहुरकर यांच्या पत्नी प्रमिला ताई यांनी आपली तब्येत अत्यंत गंभीर असताना देखील सत्कारमूर्ती ॲड. शिवराज कोळीकर यांच्या पत्नी वंदनाताई कोळीकर यांचा साडी, शाल, पुष्गुच्छ देवुन सत्कार केला. तेव्हा सभागृहातील उपस्थित जनसमुदायानी उभे राहून प्रमिला ताईच्या धाडसाच कौतुक केले, त्यांच्या ह्या आंबेडकरवादी विचारांच्या धम्मनिष्ठेला सर्वांनी मानाचा मुजरा केला. तसेच पवार कॉम्प्लेक्स मधील महिला शैला मोरे, सरला हिरामण मोरे, जयश्री लोंढे, बोरसे ताई यांनी कोळीकर दाम्पत्याचा साडी, ड्रेस,शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. घाटकोपर येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दिवाण सर, प्रवीण बर्वे यांनी ॲड.कोळीकर यांचा सत्कार केला.

सत्कार संयोजन समितीचे सहसचिव सुनीलराज सैदाणे यांच्या वतीने बुध्द आणि त्याचा धम्म ह्या महान अन् पवित्र ग्रंथाचे वाटप करण्यात आले.बदलापूर येथील समाजसेवक मान.बळीराम जाधव यांचा त्यांच्या सामाजिक योगदाना बद्दल पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आला. सत्कार समारंभ कार्यक्रमाचे संचलन सचिव राजु विघे व संजय कांबळे यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी समितीचे निमंत्रक ज्ञानेश्वर गोतावळे यांनी आभार मानले.