सिंदेवाही ग्रामीण रुग्णालयातील रुग्ण वाऱ्यावर-कर्मचाऱ्यांचे चाळे खाटावर!

664

🔹अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

सिंदेवाही(दि.9ऑक्टोबर):–सिंदेवाही येथील ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी मुख्यालयी रात्रीला मुक्कामी राहून स्वतः मौजमस्ती करीत असतात. रुग्णांना वेळेवर पाहिजे तसे उपचार मिळत नसल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांकडून होत आहे.

रात्रीच्या वेळी वैद्यकीय अधिकारी हजर राहत नसल्याने रुग्णांना वाऱ्यावर सोडल्याचे चित्र या रुग्णालयात पहावयास मिळते. नर्स अनुभवी नसल्याने रुग्णांना सलाईन लावते वेळेस रुग्णांना त्रास सहन करावा लागतो. दिवसाला सुद्धा अनुभवी नर्सच्या हातानी सलाईन न लावता सफाही कर्मचाऱ्यांच्या हातानी रुग्णांना सलाईन लवल्या जाते. अशी रुग्णाच्या नातेवाकांकडून माहिती प्राप्त झाली. डॉक्टर दुपारी १२ वाजेपर्यंत कर्तव्यावर पोहोचतात. तोपर्यंत रुग्णांना त्यांची वाट पाहत ताटकळत बसावे लागते.

त्यानंतरही उशिरा आलेल्या कर्मचाऱ्यांकडून रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना उद्धट वागणूक दिली जात असल्याचा आरोप परिसरातील रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांकडून होत आहे. कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभाराचा त्रास रुग्णालयात भरती असलेल्या रुग्णांनाही होतो. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन ग्रामीण रुग्णालयाचा कारभार सुरळीत करावा, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांकडून होत आहे.