दिडदा दिडदा’काव्यसंग्रह प्रकाशन सोहळा उ्साहात संपन्न

110

✒️सातारा-खटाव,प्रतिनिधी(नितीन राजे)मो:-9822800812

खटाव(दि.11ऑक्टोबर):-वैद्यकीय व्यवसाय करत असताना साहित्याशी असलेले नाळ जपत निसर्ग- व्यक्ती समष्टी मानवी भावभावना यांच्या अनुषंगाने मनात उमटणारे तरंग शब्दबद्ध करत तरल काव्यनिर्मिती करणाऱ्या डॉ. अदिती काळमेख यांच्या काव्यसंग्रह प्रकाशन आज संपन झाला

प्रतापसिंह महाराज (थोरले) वाचनालयाचे पाठक हॉल सभागृह, राजवाडा, सातारा येथे पार पडलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाठ्यपुस्तक कवी हनुमंत चांदगुडे होते.त्यांनी , प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ विचारवंत किशोर बेडकिहाळ लाभले.लेखिका,कवयित्री शुभांगी दळवी यांनी संग्रहातील काही कवितांचे वाचन केले. डॉ. अदिती कळमेख यांनी काव्यसंग्रहाचा कवितालेखन ते प्रकाशन सोहळयापर्यंतचा प्रवास उलगडून दाखवला.

सागर गायकवाड यांनी केलेले मुखपृष्ठ समर्पक केले.ज्येष्ठ रंगकर्मी तुषार भद्रे यांनी पुस्तकाला लाभलेल्या प्रताप गंगावणे यांच्या प्रस्तावनेचे आपल्या अभिनयकौशल्यासह वाचन केले. डॉ. आ. ह. साळुंखे , सचिन प्रभुणे यांनी उपस्थितांना कविता वाचन केले.काव्यसंग्रहाबाबत मनोगत व्यक्त करताना डॉ. राजश्री देशपांडे यांनी स्त्रीने धिटाईने शृंगारिक काव्य लिहिणे, हे मराठी साहित्यात कसे आणि प्रेमकविता असूनही त्या उच्छुंखल वाटत नाहीत याकडे लक्ष वेधल.त्यांनी या संग्रहातील कवितांची बलस्थाने आणि अदिती काळमेख यांच्या लेखनशैली व शब्दांच्या सुयोग्य वापराचे कौतुक केले.

दिडदा..दिडदा मधील कविता कशा सर्व वयोगटातील लोकांना भावणाऱ्या आहेत, निसर्ग – व्यक्ती – समष्टी – भावनांचा तरंग कसे विहरत आहेत.. हे उलगडून दाखवले.कार्यक्रमाचे निवेदन आकाशवाणी उद्घोषिका सविता कारंजकर यांनी केले.कार्यक्रमाला ऍड. सीमांतिनी नूलकर,बाबा भोरे, मधुसूदन पतकी , डॉ. राजेंद्र माने यांच्यासहित साहित्य- कला आणि वैद्यकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.कवी रंगकर्मी चंद्रकांत कांबिरे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली आभार मानले.