बहुजन एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी राजकुमार जवादे तर राष्ट्रीय संघटन सचिव म्हणून डॉ.प्रा‌.टी.डी.कोसे यांची निवड

73

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.11ऑक्टोबर):- बहुजन एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडियाची त्रिवर्षीय सर्व साधारण सभा नुकतीच संपन्न झाली. या सभेला महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांतील सक्रिय सभासद व पदाधिकारी उपस्थित होते.सभेच्या अध्यक्षस्थानी बहुजन एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडियाचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष राजकुमार जवादे हे होते.

बहुजन एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडियाच्या घटने प्रमाणे व लोकशाही पद्धतीने आमसभेतील उपस्थित सक्रिय सभासदांमधून केंद्रीय कार्यकारिणी व राज्य कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यात राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून राजकुमार जवादे (चंद्रपूर), राष्ट्रीय उपाध्यक्ष – डॉ. प्रा. चरणदास सोळंके (अमरावती), राष्ट्रीय महासचिव – पी.एच.गवई (बुलढाणा) राष्ट्रीय संघटन सचिव म्हणून डॉ. प्रा. टी. डी. कोसे (चंद्रपूर) , राष्ट्रीय कोषाध्यक्ष- हर्षद सोनोने (अमरावती) तर राष्ट्रीय सल्लागार म्हणून अरविंद सोनटक्के ( आय. आर .एस.आयकर आयुक्त) मुंबई यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

याच सर्व साधारण सभेत महाराष्ट्र राज्याची देखील कार्यकारिणी निवडण्यात आली. महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष म्हणून प्रा.शेषराव रोकडे (नागपूर) उपाध्यक्ष -चैनदास भालाधरे (कोराडी) महासचिव – डॉ ‌.प्रा. रविकांत महींदकर (अमरावती), संघटन सचिव – सिद्धार्थ डोईफोडे (पुलगांव जिल्हा वर्धा) सचिव क्रमांक १- सिद्धार्थ सुमन ( भद्रावती जिल्हा चंद्रपूर) सचिव क्रमांक २- नरेश कुमार मुर्ती (अकोला) सचिव क्रमांक ३- दामोदर थुल ( मुंबई), सहसचिव क्रमांक १- नवनाथ देरकर (चंद्रपूर) सहसचिव क्रमांक २- गौतम सुर्यवंशी ( उस्मानाबाद) सहसचिव क्रमांक ३- शिवदास कांबळे ( नागपूर) सहसचिव क्रमांक ४- किसन थुल (तळेगाव दाभाडे जिल्हा पुणे) कोषाध्यक्ष -प्रा‌ .अशोक ठवळे (वरूड जिल्हा अमरावती), सल्लागार एड‌. इंद्रजीत मेश्राम बहुजन एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडियाच्या या नवनियुक्त कार्यकारिणीचे सर्व स्तरातील जनतेने अभिनंदन केले आहे