देवळी येथे पॅसिफिका सिड्स चा पीक पाहणी कार्यक्रम संपन्न

84

✒️शेखर बडगे(अमरावती प्रतिनिधी)मो:-9545619905

अमरावती(दि.12ऑक्टोबर):- देवडी येथील प्रगतिशील शेतकरीविलास भाऊ कांमळी यांचे शेतावर पॅसिफिका सीड्सच्या वतीने पीक पाहणी कार्यक्रम आयोजित केलेला होता. पंचक्रोशीतील शेकडो शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवून पॅसिफिका सिडस चे कपाशी वान “श्रेया 6264” या वाणाची पाहणी करत असताना हे कपाशी वान शेतकऱ्यांसाठी वरदान ठरेल आणि नक्कीच त्यांच्या उत्पादनात वाढ होईल असे प्रतिपादन तेथील शेतकऱ्यांनी बोलून दाखवले.

आगामी रब्बी हंगामामध्ये सुद्धा कंपनीचे गहू 9294, दामिनी, 4244 या वाणाची लागवड करून शेतकऱ्यांनी गहू पिकामध्ये सुद्धा चांगले उत्पादन मिळवावे असे प्रतिपादन कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर परेश पटेल, शास्त्रज्ञ डॉ.श्याम हैबतपुरे, यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले तसेच क्षेत्रिय व्यवस्थापक शेखर बडगे यांनी संस्थेबद्दल मार्गदर्शन करून उत्पादन वाढवणे हेच शेतकऱ्यांच्या हाती आहे, त्याकरिता काय उपाययोजना करता येईल त्याबाबत शेतकऱ्यांशी चर्चा करून येणाऱ्या रब्बी हंगामाचा करिता शुभेच्छा दिल्यात.

त्याप्रसंगी पंचक्रोशीतील प्रगतिशील शेतकरी, सर्व कृषी केंद्रातील संचालक तसेच कृषी सुविधा देवडीचे संचालक देशमुख साहेब यांनी कार्यक्रमा करिता सहभाग नोंदवून उपस्थित शेतकऱ्यांना नवनवीन वानाची उपलब्धता करून शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ कशी करता येईल याबद्दल मार्गदर्शन केले ..