” प्रा.गीताताई अशोकराव मडघे अमृत महोत्सवी नागरी सत्कार समारंभ समिती गठीत “

99

✒️अमरावती(पुरोगामी न्युज नेटवर्क)

अमरावती(दि.17ऑक्टोबर):-अखिल भारतीय माळी समाज महासंघ,सर्व शाखीय माळी समाज ऋणानुबंध महासंघ,तसेच विविध सामाजिक,शैक्षणिक व सांस्कृतिक संस्था व संघटनांच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून रचनात्मक कार्य करणाऱ्या प्रा.गीताताई अशोकराव मडघे यांच्या अमृत महोत्सवी नागरी सत्कार समारंभ रविवार दि.१९ नोव्हेंबर २०२३ रोजी आयोजन करण्याबाबत फुले -शाहू – आंबेडकरांच्या अनुयायांची दि. १६ ऑक्टो. २०२३ ला प्रशात नगर येथे बैठक संपन्न झाली.उपेक्षित समाज महासंघाचे अध्यक्ष प्रा.श्रीकृष्ण बनसोड (समाजभूषण) यांनी भूमिका विशद करताना , ” प्रा.गीताताई मडघे यांनी विद्यालय व महाविद्यालयीन सेवाकाळात कुशल अध्यापना सोबतच समाजप्रबोधन व महिलांच संघटन व त्यांचे सक्षमीकरण यासाठी सकारात्मक प्रयत्न केल्यामुळे त्यांच्या विधायक कार्यापासून युवा पिढीला प्रेरणा मिळावी म्हणून नागरी सत्कार समारंभाचे आयोजन होटल महफिल येथे केले आहे.” असे विचार व्यक्त केले.

सत्कार समारंभ समितीमध्ये प्रा.श्रीकृष्ण बनसोड,अँड.जीवन दुर्गे,वर्धा,अभंगकार प्रा.अरुण बुंदेले,कामगार नेते श्रीकृष्णादास माहोरे,मातंग समाज नेते उत्तमराव भैसने,श्रीमती पुष्पाताई वसंतराव फाळके,यवतमाळ, पुरोगामी लेखिका राजिया सुलताना,समाज नेते रामलाल खैरे,आदिवासी कर्मचारी संघाचे हभप के.एम.घोंगडे नंदुभाऊ मडघे( सोनोरी ),प्रा.डॉ.बी.जी.खोब्रागडे,श्री ओमप्रकाश अंबाडकर,प्रा.एन.आर. होले, वसंतराव भडके,मधुकर आखरे, सुधीरकुमार घुमटकर, हभप गोविंद फसाटे,पोलीस पाटील कविता नरेंद्र पाचघरे स्मिता संजय घाटोळ, डॉ. उज्ज्वला मेहरे,सौ.नंदा बनसोड,सौ.मिना बकाले,सौ.मालती इंगळे पाटील अनिल भगत आदींचा समावेश आहे.

वऱ्हाड विकासाच्या प्रा.गीताताई मडघे ” गौरव विशेषांकासाठी त्यांच्या प्रभावी व्यक्तिमत्वावरील लेख व कविता प्रा.श्रीकृष्ण बनसोड,सर्वज्ञ, किशोर नगर,अमरावती या पत्त्यावर पाठवण्याचे आवाहन वऱ्हाड विकास मासिकाचे सहसंपादक प्रा.अरुण बुंदेले यांनी केले आहे.