गंगाखेड तालुक्यातील जनता सुजाण असल्यामुळेच शांततेने राहते

186

🔹उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.टीपरसे यांचे मत

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.20ऑक्टोबर):-उपविभागीय कार्यालय गंगाखेड यांच्या वतीने दसरा महोत्सव निमित्त शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यातआली होती.20 ऑक्टोबर रोजी उपविभागीय कार्यालयामध्ये शांतता कमिटीच्या बैठकीमध्ये प्रमुख उपस्थिती मध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.दिलीप टिपरसे,पोलीस निरीक्षक कुंदन वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व पत्रकार उपस्थित होते.दसरा महोत्सव बरोबरच इतरही सणांमध्ये हिंदू-मुस्लीम,बौद्ध इतर धर्मियांकडून शांतता सुव्यवस्था राखण्यामध्ये मदत होत असते.

सणउत्सवाच्या निमित्ताने आपण सर्वांनी मिळून सर्व सण साजरे केले पाहिजे आज परिस्थितीला मराठा आरक्षण धनगर,समाज आरक्षण,गणपती उत्सव, धम्मचक्र परिवर्तन दिन यासारखी सोहळे साजरी होत असताना गंगाखेड तालुक्यातील जनता सुज्ञ असल्यामुळेच आपले सण,उत्सव साजरी होत आहेत.

त्याबरोबरच शांततेच्या दृष्टीने गंगाखेड शहरातील ट्राफिक जामचा मुद्दा लक्षात घेता दैनंदिन अडचण लक्षात घेता गंगाखेड शहरातील मध्यवर्ती ठिकाणांमधील डॉ.आंबेडकर चौकातील ट्राफिक पाहता गंगाखेड शहरामध्ये ट्राफिक बॅच करिता मंजुरी पाठवली आहे परंतु ट्राफिक बॅच मान्यता नसल्यामुळे सध्या तरी टॉपिक बॅचवर निर्णय घेऊ शकत नाहीत.