जी.प. माजी सदस्य डॉ. देवनाथ गंधारे यांनी राबविला स्व-खर्चातून पायऱ्याची विहिरीचे स्वच्छतेचा उपक्रम

133

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.22ऑक्टोबर):– जग प्रसिद्ध ताडोबा व्याघ्र प्रकल्पा कडे जाणाऱ्या मासळ रस्त्या लगत प्राचीन पायऱ्याची विहीर आहे. परंतु या विहिरीच्या सभोवताल गवत असल्याने विहीर दबल्या गेली आणि विहीर दिसत नव्हती. दररोज याच मार्गावरून जात असताना विहिरी कडे लक्ष जात होते.

जगातील देशातील काना कोपऱ्यातून येणाऱ्या पर्यटकांना विहीर दिसत नव्हती . तेव्हा मनात आल की पायऱ्याची विहिरीची स्वच्छता करायची. माजी जी.प. सदस्य डॉ. देवनाथ गंधारे यांनी स्वखर्चातून विहिरीची स्वच्छता करण्यास सुरवात केली.

या प्रसंगी माजी जी.प. सदस्य डॉ देवनाथ गंधारे, प. स. माजी सभापती प्रकाश वाकडे, चिमूर सहकारी तांदूळ गिरणी संचालक ओमप्रकाश गणोरकर, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक प्रकाश पोहनकर, दिलीप सुर, नामदेव पिसे, अशोक कामडी, पत्रकार रामदास हेमके आदी उपस्थित होते .