पोद्दार जम्बो किड्स अँड ऑक्सफर्ड फाउंडेश स्कूल मध्ये दांडिया स्पर्धा उत्साहात संपन्न

180

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.22ऑक्टोबर):- येथील पोद्दार जम्बो किड्स अँड ऑक्सफर्ड फाउंडेश स्कूल मध्ये दिनांक 21आक्टोबर 2023 रोजी दांडिया स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या.

या स्पर्धे साठी प्रथम पारितोषिक हे गोविंदराज ज्वेलरस चे मालक गोविंद रोडे यांच्या तर्फे मोत्या ची नथ , तसेच द्वितीय पारितोषिक हे वैष्णवी फर्निचर चे मालक जगदीश तोतला यांच्या तर्फे मानाची पैठणी, तर तृतीय पारितोषिक हे लायन्स क्लब गंगाखेड गोल्ड सिटी चे अध्यक्ष श्रीधरचार्य जोशी यांच्या तर्फे मानाची पैठणी, उत्तेजनार्थ पारितोषी हे परीक्षक म्हणून लाभलेल्या पूनम संतोषजी तापाडिया व जगदीशजी तोतला यांच्या तर्फे देण्यात आले.

या स्पर्धेतील प्रथम पारितोषिक मोत्याची नथ विजेत्या ह्या निशा चव्हाण या राहिल्या, द्वितीय विजेत्या गौरी मॅम व तृतीय पारितोषिक विजेत्या मानाची पैठणी ही सौ रंजना तुपे यांना मिळाले.या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून सौ पूनम संतोषजी तापडिया या, सौ सुनीता राजू देशमुख व सौ सिमा भोजक मॅम यांनी कार्य केले. या कार्यक्रमांसाठी प्रमुख उपस्थिती ही सौ ज्योती सातपुते, सौ वृषाली मुरकुटे, सौ माया राठोड, सौ संगीता राठोड, सौ ज्योती पवार व शामबाला भोसले व भगत सुरवासे यांची होती.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य विष्णू मुरकुटे, उप प्राचार्य कीर्ती सातपुते, सौ कोमल चिनके, सौ जयश्री मुरकुटे, सौ शीतल देशमुख, श्री प्रभाकर भोसले, श्री सचिन कसबे, सौ वैशाली कराड, प्रणाली महाजन, सौ अर्चना उपाध्याय, श्री राधे आवड, भारत पवार, अशोक राठोड, रोडे, व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले.कार्यक्रमचे सूत्रसंचालन सौ कोमल मकरंद चिनके यांनी केले तर आभार प्राचार्य विष्णू मुरकुटे यांनी मानले.