विश्वदिप महाबोधी बुध्दविहार येथील वर्षावासाचा समापन कार्यक्रम संपन्न

141

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.29ऑक्टोबर):-विश्वदिप महाबोधी विहार व सुजाता महिला मंडळ श्रीरामपुर संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे विश्वदिप महाबोधीविहारात आषाढ पोर्णिमेपासुन ते अश्विन पोर्णिमेपर्यंत भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन केल्या जाते.या ग्रंथ वाचनाचा समापन कार्यक्रम दि.२८ ऑक्टोंबर२०२३रोजी घेण्यात आला होता.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.भास्करराव पाढेण प्राचार्य फुलसिंग नाईक महाविद्यालय पुसद तर प्रमुख अतिथी म्हणुन आदिवाशी विभाग प्रकल्प अधिकारी आत्माराम धाबे, अँड्. धम्मभुषण आप्पाराव मैंद, बाळासाहेब सोनोने, माजी नगरसेवक अर्जुनराव लोंखडे,विश्वदिप महाबोधी विहाराचे अध्यक्ष साहेबरावजी गुजर उपस्थित होते.

या प्रमुख अतिथींच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध व डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. सुजाता महिला मंडळाच्या उपासिकांनी बुद्धवदंना घेतली. याप्रसंगी अँड्.धम्मभुषण आप्पाराव मैंद व सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब सोनोने यांचा गोपाळबाबा वलंगकर राज्यस्तरीय जिवन गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डाँ. भास्करराव पाढेण यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. प्रमुख अतिथी मा.धाबेसाहेब ,बाळासाहेब सोनोने, मा.अँड्.आप्पाराव मैंद यांची समयोचित भाषणे झाली.

याप्रसंगी माजी प्राचार्य सुधाकरराव बन्सोड, तुकाराम चौरे यांचा वर्षावासमध्ये ग्रंथवाचन केल्याबद्दल शाल व पुष्पगुच्छ देऊन प्रमुख अतिथींच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विश्वदिप महाबोधी विहाराचे सचिव राधाकिसन गवई,यांनी केले तर आभारप्रदर्शन सुभाषराव काजळे यांनी मानले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुजाता महिला मंडळाच्या भगिनींनी अथक परिश्रम घेतले.सुजाता महिला मंडळाच्या वतीने पोर्णिमेनिमित्त् खिर वाटप केली.सरणतय गाथेंनी कार्यक्रमाची सांगता झाली.