भाजपा ओबीसी मोर्चा प्रायोजित ब्रम्हपूरीत नरेंद्र मोदीजींचा “मन की बात, विश्वकर्मा के साथ कार्यक्रम संपन्न”

97

🔹भाजपा ओबीसी मोर्चाचे आयोजनात माजी आमदार प्रा.अतुलभाऊ देशकर व प्रा प्रकाश बगमारे ओबीसी मोर्चा प्रदेश सदस्य यांची प्रमुख उपस्थिती

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपूरी(दि.29ऑक्टोबर):-भारताचे जगविख्यात, लोकप्रिय आणि यशस्वी पंतप्रधान मा.नरेंद्र मोदीजींचा विलक्षण लोकप्रिय “मन की बात” हा कार्यक्रम आज दिनांक 29 ऑक्टोबर 2023 रोजी हिंदू ज्ञान मंदिर ब्रह्मपुरी येथे आयोजित करण्यात आला होता.हा कार्यक्रम “विश्वकर्मा योजना” या संदर्भात विस्तृत माहिती देणारा असा होता.”मन की बात, विश्वकर्मा के साथ” हे आजच्या कार्यक्रमाचे स्लोगन होते.ब्रह्मपुरी भाजपा ओबीसी मोर्चा तर्फे आयोजित कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण LED स्किनवर “हिंदू ज्ञान मंदिर ब्रह्मपुरी” येथे करण्यात आले.

या कार्यक्रम ब्रह्मपुरी विधानसभेचे लाडके माजी आमदार प्रा.अतुलभाऊ देशकर,भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश सदस्य प्रा.प्रकाश बगमारे,तालुकाध्यक्ष प्राचार्य अरुण शेंडे, शहराध्यक्ष इंजिनियर अरविंद नंदुरकर,मन की बात कार्यक्रम, शहर संयोजक साकेत भानारकर,सौ.रश्मीताई पेशणे जिल्हा उपाध्यक्ष भाजपा चंद्रपूर, यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

भा.ज.पा.ओबीसी मोर्चा तालुकाध्यक्ष कॉन्ट्रॅक्टर प्रेमलाल धोटे,भा.ज.पा.ओबीसी मोर्चा शहराध्यक्ष प्रा.डॉ.अशोक सालोटकर,प्रा.रामलाल महादेव दोनाड‌‌‌कर तालुकाध्यक्ष भाजयुमो ब्रह्मपुरी तालुका, मनोज वटे नगरसेवक ब्रह्मपुरी; सुभाष नाकतोडे महामंत्री,भाजपा ओबीसी मोर्चा, प्रा. रमेश गिरी शहर महामंत्री, भाजपा ओबीसी मोर्चा ब्रह्मपुरी,आर.एस.भागवत शहर महामंत्री भाजपा ओबीसी मोर्चा ब्रह्मपुरी,नीलकंठ मानापुरे माजी पं.स.सदस्य,चुमदेव जांभुळकर भाजपा अनुसूचित जाती जिल्हा पदाधिकारी, पुरुषोत्तम पत्रे,प्रा.दिवाकर पिलारे,नागोजी कार , विठ्ठलराव पुसदकर, सुरेश बनपूरकर, फकीरा पा.गराडे, अनंता बनपूरकर, इ.भाजपा पदाधिकारी यांचे सह अन्य या कार्यक्रमाला उपस्थित होते.

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचे रजिस्ट्रेशन केलेल्या कारागीर बांधवांनी या योजनेचे जिल्हा संयोजक प्रा. प्रकाश बगमारे 9403329355 यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन या प्रसंगी करण्यात आले.