धानाला प्रति क्विंटल 3000 रु हमीभाव द्या – स्वाभिमानी शेतकरी संघटना

252

🔹जिल्हाधिकारी यांना निवेदन

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

भंडारा(दि.1नोव्हेंबर):-निसर्गाचा लहरीपणा आणि शासनाच्या बेकायदेशिर पणा मुळे शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे. शेतकऱ्यांचा वार्षिक उत्पन्नावर मिळणाऱ्या उत्पादनावर जिवन अवलंबुन आहे. परंतु पिकाला भाव मिळत नसल्याने तसेच पिकांवर रोगराई उद्भवल्याने शेतकरी हवालदील झालेला आहे. शेतीला लागणारा खर्च हा उत्पादनातुन मिळणाऱ्या रकमेपेक्षा अधिक दिसुन येत आहे. पान लागवडीपासून ते धान मळणी पर्यंतचा एकूण खर्च 23000 से 27500 के प्रति एकर येतो व एका एकरातून उत्पन्न 24000 से 30000 रु होतो.

शेतीला प्रती एकर येणारा खर्च बिज खरेदी खर्च- 1500 से 2000 रू ,नांगरटी खर्च- 2500 से 3000 रु, रोवणी खर्च 3500 से 4000 रु, कटाई खर्च 3000 से 3500 रु, खताचा खर्च 4000 से 5000 रु, मळणी खर्च- 2000 से 2500 रु,विक्रीसाठी नेण्यासाठी ट्रॅक्टर भाडे खर्च- 2000 ते 2500 रु, फवारणी खर्च 4000 से 5000 रु व इतर खर्च. शेतीला लागणारा खर्च पाहता शेतकऱ्यांना शेती करणे अवघड झाले असून, शेतकरी आत्महत्याचे प्रमाण वाढत आहे. तरी धान पिकास 3000 रु प्रती क्विंटल हमीभाव देण्यात यावा व शासकीय धानखरेदी लवकरात लवकर सुरु करण्याचे आदेश देवुन शेतकऱ्याला जिवनदान द्यावे. अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्याकडून करण्यात आली.