इम्तियाज नदाफ यांची वंचितच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते पदी निवड…

408

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.2नोव्हेंबर):-माण तालुक्यामध्ये तसेच महाराष्ट्र मध्ये आंबेडकरी चळवळीशी विचारांनी घट्ट नाते असलेले मुस्लिम मावळे, शिव,शाहू,फुले, आंबेडकर या महापुरुषांचा वैचारिक वारसा जपणारे इम्तियाज नदाफ यांची वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते पदी निवड झाली असून, महाराष्ट्रभर कौतुक होत आहे.

त्याच बरोबर “महराष्ट्र भर काम कर व वंचित घटकांचा आवाज बन आणि महाराष्ट्राला दिशा दे..!” अशा शब्दात दस्तुरखुद्द वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय अध्यक्ष एडवोकेट प्रकाश आंबेडकर यांनी कौतुक केले.

सातारा जिल्ह्यामधील वडूज नगरपंचायत असो किंव्हा आंधळी ग्रामपंचायत असो या राजकारणामध्ये पक्षाच्या वतीने चाणक्याची भूमिका बजावून वडूज नगरपंचायत मध्ये एक नगरसेवक निवडून आला असताना पक्षाची वाढ होण्यासाठी एकाचे दोन नगरसेवक करण्यासाठी प्रस्थापितांशी रननितिकार बनून वाटाघाटी करत चोख भूमिका बजावली. तसेच आंधळी ग्रामपंचायत मध्ये कोणाची युती ना आघाडी करता स्वतंत्र पॅनल स्वतः उभा करून वंचित घटकांना एकत्र करून व मतदारांना विश्वासात घेऊन तत्कालीन भाजपा जिल्हा अध्यक्ष व आमदार जयकुमार गोरे यांच्या गावामध्ये वंचितचा स्वतंत्र ग्रामपंचायत सदस्य आरक्षित जागेवर नाही तर खुल्या गटातून निवडून आणला.

पश्चिम महाराष्ट्र मध्ये महाबलाढ्य असलेले काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा असे भांडवलशाही राजकीय पक्ष असून सुद्धा या मध्ये एकही रुपया खर्च न करता वंचितांच्या मतांवर कसे निवडून यावे, याचे उत्तम उदाहरण देत वंचित बहुजन आघाडीला जिल्यात राजकीय पटलावर स्वाभिमानाने प्रमुख प्रवाहात आणून दाखवले.त्याचबरोबर सातारचे गांधिमैदान आपल्या अभ्यासू आणि आक्रमक भाषनांनी गाजवून सोडलं..याची दखल घेत पक्षाध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी मा. इम्तियाज नदाफ यांची वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते पदी निवड केली .

सदर निवडी बद्दल प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर, युवा नेते सुजात दादा आंबेडकर, सातारा जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण देसाई, जिल्हा महासचिव आणि वडुजचे नगरसेवक तुषार तात्या बैले, ज्येष्ठ नेते सुभाषराव गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश जावळे, जिल्हा संघटक विठ्ठल झेलेपाटील, चंद्रकांत खरात, ज्येष्ठ नेते अशोक बैले, जयवंत बैले, बी आर जगताप, तालुका अध्यक्ष युवराज भोसले, तालुका महासचिव बजरंग वाघमारे, राजेंद्र आवटे, पोपटराव खरात, महिला आघाडीच्या सपनाताई भोसले, चित्राताई गायकवाड, माधुरी भोसले, आंधळी ग्रामपंचायत सदस्य अतुल खरात, युवा नेते आजिम मुल्ला, रणजित सरतापे, सलाउद्दिन काझी, इत्यादींनी अभिनंदन केले.