ओबीसी समाज देशात सर्वात मोठ्या संख्येने असून ही त्याची दिशाभूल मोठ्या प्रमाणात केली जाते. कारण समाज जर विविध सामाजिक प्रश्नां बाबतीत वैचारिक दुष्ट्या जागरूक असेल तर त्याची कोणताही पुढारी दिशाभूल करू शकणार नाही. समाजाची दिशाभूल करतांना शंभर वेळ विचार नक्कीच करेल.समाजाच्या पुढाऱ्यांनी सुद्धा समाजाची दिशाभूल करु नये.यासाठीच संबंधित समाजाचा पुढारी जागरूक असणे गरजेचे असते. ओबीसी समाजातील सुतार समाज सामाजिक क्षेत्रातील सामाजिक विषयाबाबत किती जागरूक आहे याबाबत मी लिहत आलो आहे. ओबीसी सुतार समाजात किती ही सामाजिक संघटना, सामाजिक संस्था आणि सुतार समाजाच्या नावाने इतर काही अनेक सामाजिक प्रतिष्ठान मोठ्या संख्येने उदयास आले. पण वैचारिक अधिष्ठान नसल्यामुळे प्रत्येक ओबीसी संघटना जातीव्यवस्था समर्थन करणाऱ्या पक्षा सोबत जोडल्यामुळे ओबीसी समाजाचा शैक्षणिक राजकीय आणि आर्थिक सत्यानाश होत आहे.
तरी सुद्धा मोठा असंतोष मात्र रस्त्यावर बाहेर निघत नाही. ओबीसी समाजाच्या सामाजिक सर्वांगीण विकासासाठी सर्वसमावेशक सामाजिक अजेंडा तयार होत नाही तो पर्यंत त्यांची दखल कोणताही पक्ष घेणार नाही.म्हणूनच ओबीसी समाजाचा राजकीय अजेंडा तयार करून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न त्या मधील विकासाचे मुद्दे त्यांची ठळक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन समाजात त्याचा वापर केला पाहिजे.
अंमलबजावणीचा निश्चित एक कालावधी असला पाहिजे. याची माहिती जो पर्यंत समाजा समोर येणार नाही आणि समाज बांधव जो पर्यंत सामाजिक विकासात्मक विषयावर चर्चा करणार नाही, वाचा फोडण्यासाठी प्रयत्न करणार नाही. तोपर्यंत खऱ्या अर्थाने सामाजिक विकासात्मक गोष्टींला चालना मिळणार नाही हे एक शंभर टक्के सत्य आहे. चिकित्सा व समीक्षा करा आणि सामाजिक दिशाभूल होत असेल तर ती टाळा. माझा समाज आदर्श समाज. सुतार समाज जागृती अभियान अंतर्गत सिलसिला सदिच्छा भेटीगाठीचा राबविला पाहिजे.
तरच भविष्यात सामाजिक विकासात्मक म्हणजे खऱ्या अर्थाने सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न झाले नाही तर सुतार समाज पटलावरून नेता हा शब्द हद्दपार होईल. मग सुरू होईल फक्त ओबीसी सुतार समाजात स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी जिवतोड धडपड हे सोपं सुत्र आहे.जो कोणी खऱ्या अर्थाने सामाजिक विकासासाठी प्रयत्न करील त्याला अस्तीत्व टिकवण्यासाठी जास्त धावपळ जास्त मेहनत घ्यावी लागणारच नाही. समाजात आपोआप अस्तित्व निर्माण होईल.मोजक्याच ओबीसी सुतार समाज गोतावळ्यात या पलीकडे दरडोई नेतृत्वाखाली ओबीसी बद्दल संविधान, जनगणना, आरक्षण इत्यादी वैचारिक प्रबोधनात्मक कार्यक्रमात आपल्या स्वतःच्या हक्काच्या जिल्ह्यातील फक्त पाच हजार सुद्धा ओबीसी सुतार समाज बांधवांना एकत्रित करणे जमत नाही तो राज्य पातळीवरील नेता बनण्याचे स्वप्न पाहतो.त्यासाठी तो इतर पक्षाच्या कुबड्या वापरतो. कारण आम्ही आणि आमच्या सुतार समाज संघटना आणि सुतार समाज संस्था राज्यस्तरीय किती जिल्ह्यात क्रियाशील आहेत यांचे मूल्यमापन करत नाही. आणि समाजात बेधडकपणे बिनधास्त धडाकेबाज पद्धतीने स्वतःलाच ओबीसी सुतार सामाजिक क्षेत्रातील ओबीसी नेता म्हणून मिरवतो.
ओबीसी समाज जागृती मेळावा आयोजित करा. हजारोंच्या संख्येने ओबीसी सुतार समाज बांधवांना एकत्र करा एकाही राजकीय पक्षाच्या नेत्यांना न *बोलावता* केवळ सुतार समाजाचा मेळावा घ्या आणि समाजात आपली सामाजिक पत सामाजिक किंमत प्रभाव प्राबल्य प्रभुत्व आणि समाजात प्रतिष्ठा सोबतच अस्तीत्व सुद्धा ओबीसी सुतार समाजात किती टक्के आहे तपासून पहा. ओबीसी बद्दल समाज जागृती कार्यक्रम राबविणे गरजेचे इतर ओबीसी संघटना ओबीसी बद्दल रस्त्यावर उतरतांना दिसतात.ओबीसी सुतार समाज जागृती कार्यक्रम राबविण्यात आला पाहिजे.यासाठी अगोदर आपल्या ओबीसी सुतार सामाजिक क्षेत्रातील नेतेमंडळी युवा नेतेमंडळी आणी ओबीसी सुतार सामाजिक क्षेत्र ते राजकीय क्षेत्रातील विविध सन्माननीय पदाधिकारी यांनी राज्यस्तरीय ओबीसी सुतार सामाजिक क्षेत्रात एकत्र बसून पारदर्शक पध्दतीने सुसंवाद साधला पाहिजे.
ओबीसी सुतार सामाजिक क्षेत्र हे छोटस तळ किंवा छोटस डबकं समजु नये, ओबीसी सुतार सामाजिक क्षेत्र म्हणजे महाकाय सागर आहे जेवढे खोलवर जाल तेवढे विषय हाताला लागतील. थेट माझ्या वैयक्तिक मोबाईल नंबर वर संपर्क साधावा. कृपया गैरसमज असेल तर ताबडतोब काढुन टाकणेच समाजहिता करिता उचित ठरेल योग्य प्रकारे सामाजिक खुलासा देण्यात येईल आणी त्याच सामाजिक पध्दतीने तोडीसतोड सामाजिक खुलासा घेण्यात येईल. आणी वादविवाद रेकॉर्डिंग ओबीसी समाजा समोर जाहीरपणे प्रसिद्ध करण्यात येईल. ओबीसी सुतार सामाजिक क्षेत्रातील विविध सामाजिक विषयावर मी सामाजिक दृष्टीने लेखन करतो. कृपया कृपा करून माझी बदनामी होईल अशी चर्चा आपसात न करता थेट माझ्या मोबाईल नंबर वर संपर्क साधावा मी संबंधित ओबीसी सुतार सामाजिक विषयावर लेखाचा सविस्तर, व्यवस्थित मुद्देसूद खुलासा देण्याची व त्याच पद्धतीने खुलासा घेण्याची क्षमता ठेऊनच आहे. सोयीनुसार पळवाट शोधणे हा अपारदर्शक समाज अगुणधर्म जमणार नाही संवैधनिक लोकशाही पध्दतीने चर्चा होईल.ओबीसी सुतार समाजहित लक्षात घेऊन मी 45 ते 50 लाख लोकसंख्या असलेल्या ओबीसी सुतार सामाजिक क्षेत्रातील विविध विषयांवर माझ्या अल्पबुद्धिनुसार सतत लिखाण करीत असतो कारण समाजाची दिशाभूल होऊ नये यासाठी आपल्या समाजाने सुध्दा जागरूक असणे गरजेचेच असते.
✒️प्रमोद सूर्यवंशी(चिखली,मातृतीर्थ बुलडाणा)मो:-८६०५५६९५२१