स्वस्त धान्याचा अपहार-तहसील पूरवठा विभागाचे भ्रष्ट धोरण पूरवठा कर्मचार्‍याची नागरीकांना दमदाटी

123

 

किशोर राऊत तालुका प्रतिनिधी

 

महागांव : राज्यातील गरीब जनतेच्या उदरनिर्वाहासाठी शासनाने मोफत धान्य योजना अमलात आणली परंतू महागांव तहसीलच्या पूरवठा विभागाने गरीबांच्या तोंडातील अन्न हिसकावून शासनाच्या योजनेचा फज्जा उडवला असल्याची मलकापूर येथील ७३ लाभार्थ्यांनी तक्रार केली आहे.
सविस्तर वृत्त असे की, मौजे मलकापूर (चिखली) येथील महिला पूरुष असे एकूण ७३ लाभार्थी आज तहसील कार्यालयात धडकले. त्यांनी विद्यमान तहसीलदारांकडे आपली कैफीयत मांडली. ज्ञानेश्वर पुरुष बचत गटाचे स्वस्त धान्य दूकानदार सुधाकर भोयर यांनी मागील माहे आक्टोबर चे धान्य वाटप केलेच नाही, तर ते गायब केले.डीलरला लाभार्थ्यांनी धान्याची मागणी केली असता, उडवाउडवी उत्तरे मिळतात त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आज दूपारी थेट तहसील कार्यालय गाठले.यावेळी एक पूरवठा कर्मचारी उलटपक्षी ग्रामस्थांची दमदाटी करतांना आढळून आले. सदरील प्रकरण तत्कालीन प्र. तहसीलदार विश्नांभर राणे यांच्या कार्यकाळातील असल्याचे नागरीकांमधून बोलले जाते.
महत्वाची बाब अशी की, पूरवठा विभागाच्या अाशिर्वादाने मलकापूरच्या स्वस्त धान्याचा सावळागोंधळ झाला आहे.या प्रकरणाची तहसील प्रशासनाने सखोल चौकशी करुन नियंत्रीत नसलेल्यांवर कार्यवाही करावी अशी मलकापूरच्या ग्रामस्थांची अपेक्षा असून, पुंडलीक भूरके ग्रा. पं. सदस्य, माजी सरपंच हारीदास तोरकड,चिंतामन डाखोरे, भिवाजी वैद्य, देविदास माळकर, अमोल खंदारे, पुंडलिक खंदारे, सुशिला धुमाळे, कोशल्याबाई आढाव आदींनी निवेदनावर सह्या केल्या आहे.