प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाने बहुरूपी व उपेक्षीत समाजासोबत साजरी केली दिवाळी भोकर तालुका कार्यकारिणीचा स्तुत्य उपक्रम

55

 

नांदेड : समाजाचं काही देणं लागतं ही उत्कृष्ट संकल्पना प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्रभर राबवित आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ भोकर व रूरल ग्रामीण प्रोड्युसर कंपनी लिमिटेड भोकरच्या संयुक्त विद्यमाने उपेक्षित बहुरूपी, घिसाडी, रेल्वेस्टेशन येथील गरीब गरजूना दिवाळी निमित्त संवाद साधत त्यांना दिवाळीचा फराळ भेट देऊन २०२३ ची दिवाळी साजरी केली.
गावोगावी फिरून लोकाचे मनोरंजन करून पोटाची खळगी भरण्यासाठी बहुरूपी समाज हा सोलापुर जिल्हयातील माळशिरस या गावचा असून भोकर येथे सध्या स्थायिक झाल्याचे दिसून येते.
अनेक दिवसापासून हा समाज भोकर येथील शहरालगत किनवट रोडच्या बाजुला खुल्या जागेवर कंटुबासह पालीमध्ये उदरनिर्वाह करीत आहे.
बहुरूपी हा कला गुण संपन्न असुन त्यांच्या कला गुणांना नाट्यक्षेत्रात फिल्मी क्षेत्रात वाव मिळत नाही, शिक्षणा अभावी हा समाज मागे आहे, तो पुढे जाऊ शकला नाही ही ही खंत यावेळी व्यक्त करण्यात आली.
बहुरूपी समाज भटक्या जमातीमध्ये मोडतो. आज या गावाला तर उदया दुसऱ्या गावाला जाऊन पाल मांडतो.
ग्रामीण भागात गावोगावी जावून दिवसभरात लोकांचे मनोरंजन करून इतभर पोटाची खळगी भरण्यासाठी वणवण फिरत आहे. स्पर्धेच्या युगात इंटरनेटचा जमाना, महागाईमुळे दारीद्रयात वाढ, सुशिक्षीत बेकार संख्येत वाढ झाली आहे. नौकरी करण्याची इच्छा असुनही नौकरी मिळत नाही, युवा पिढीच्या हाताला काम नाही.
वंचित घटकाला मुलभुत हक्क व न्याय मिळवून देण्याचे काम प्रशासनाचे असून त्यांनी ते योग्य रितीने पार पाडावे असे संघटनेच्या वतीने विचार मांडण्यात आले.
यावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे भोकर तालुकाध्यक्ष उत्तम कसबे, भोकर रूरल ग्रामीण प्रोड्युसर कंपनीचे संचालक अध्यक्ष माधवराव सलगरे यांनी बहुरूपी समाज कुंटुबीयासोबत संवाद साधला.
त्यांना शिक्षणाचे महत्व पटवून देऊन ‘बहुरूपी समाजाची भटकंती या विषयावर चर्चा केली.
यावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे भोकर तालुकाध्यक्ष उत्तम कसबे, सचिव सुभाष नाईक किनीकर, अशोक निळकंठे, श्याम वाघमारे, रूरल ग्रामीण प्रोड्युसर कंपनी लिमिटेडचे संचालक अध्यक्ष माधवराव सलगरे, व्यंकटराव हामंद, विठ्ठल देवड आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ भोकर तालुका कार्यकारिणीने उत्कृष्ट उपक्रम राबविल्याबद्दल संघाचे संस्थापक अध्यक्ष डी.टी. आंबेगावे, मराठवाडा संपर्क प्रमुख आनंद भालेराव, नांदेड जिल्हाध्यक्ष संजीवकुमार गायकवाड, राज्य विभाग, जिल्हा व तालुका कार्यकारिणीने भोकर कार्यकारिणीचे अभिनंदन केले आहे.