दहावी मध्ये, फिजा खान 92.80 टक्के गुण मिळवत न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव मध्ये द्वितीय

33

✒️आदेश उबाळे(श्रीगोंदा तालुका प्रतिनिधी)मो:-9823503547

श्रीगोंदा(दि.30जुलै):-श्रीगोंदा-महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शालान्त परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून फिजा अस्लम खान हिने शालांत परीक्षेत पहिल्या श्रेणीत उत्तीर्ण होऊन भरीव यश संपादन केले आहे रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कुल मढेवडगाव मध्ये शालांत परीक्षेत 92.80% गुण मिळविले आहेअसलम खान यांची कन्या आहे या यशाबद्दल तिचे माजी मंत्री आमदार बबन राव पाचपुते, दैनिक श्रीगोंदा सिटीजन चे संपादक आमीन भाई शेख श्रीगोंदा नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष अख्तर भाई शेख, म्हातार पिंपरी चे माझी सरपंच राजुभाई खान मुख्याध्यापक बी .जी कोरडे ,पर्यवेक्षक दांगडे एच .के आदींनी अभिनंदन केले.
कुमारी फिजा चे मढेवडगाव पंचक्रोशीत मढेवडगाव,
म्हातार पिंपरी ,बाबुर्डी ,शिरसगाव बोडखा या गावांमध्ये सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.