मी फक्त समाजसेवेसाठीच उमरखेड महागाव विधानसभा क्षेत्रात आलो – साहेबराव कांबळे (सामजिक कार्यकर्ते)

154

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि.10डिसेंबर):-शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आदिवासींचे नायक तंड्या मामा भिल आणि सोमा डोमा आंध यांच्या स्मृती दिनानिमित्ताने आदिवासी संघर्ष परिषद चे आयोजन बिरसा क्रांती दल यांनी केले होते.या कार्यक्रमाचे अध्यक्ष दशरथ मडावी संस्थापक अध्यक्ष बिरसा मुंडा दल तर कार्यक्रमाचे उद्घाटक समाजसेवक साहेबराव कांबळे हे होते.

यावेळी साहेबराव कांबळे उद्घाटकीय भाषणात म्हणाले की, मी फक्त जनतेच्या सेवेसाठी उमरखेड महागाव विधानसभा क्षेत्रात आलो आहे. मी उच्च पदावर होतो पण समाजसेवा करण्याची इच्छा मनामध्ये घेऊन मी स्वतः राजीनामा देऊन माझी जन्मभूमी उमरखेड तालुक्यातील बेलखेड आहे. या क्षेत्रात मला जनतेच्या सेवेसाठी काम करायचे आहेत.

मी दोन्ही तालुक्यात फिरत असताना मला लोकांच्या अनेक अडचणी ऐकायला मिळाल्यात.उमरखेड आणि महागाव सारख्या ठिकाणी एकही कंपनी आजपर्यंत उभारण्यात आलेली नाही.त्यामुळे गावांमध्ये बेरोजगारी निर्माण झालेली दिसत आहे.त्यांना हक्काचे काम सुद्धा मिळत नाहीत म्हणून मी या दोन्ही ठिकाणी येणाऱ्या काळात रोजगार उपलब्धी साठी 30 ते 32 कंपन्या स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे.

आजपर्यंत कोणत्याही राजकीय नेत्याला तरुणांच्या बेरोजगारी बद्दल व त्यांच्या उदरनिर्वाह व्हावा म्हणून कोणतेही ठोस पाऊल आजपर्यंत उचललेच नाही.

तसेच ग्रामीण भागामध्ये विद्यार्थ्यांना पुस्तके सुद्धा उपलब्ध करून दिली नाही.पण आम्ही पुढाकार घेऊन वर्ग 10वी च्या विद्यार्थ्यांना पुस्तकांचा पूर्ण सेट देण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे.तसेच बंदी भागातील लोकांनी गावाच्या रस्ता मंजुरीसाठी अनेक वेळा मागण्या केल्या होत्या.पण त्यांना वन विभागाच्या परवानगी नसल्यामुळे तो रस्ता कित्येक वर्ष तसाच राहिला होता.

पण मी स्वतः त्याचा पुढाकार घेऊन रस्ता मंजुर करून दिला.अशा पद्धतीने जनतेच्या सुखा दुखात सहभागी होऊन फक्त जनतेचा सेवक म्हणून काम करण्यासाठी या क्षेत्रामध्ये मी आलो आहे. असे ते आदिवासी संघर्ष परिस्थितीमध्ये बोलत होते.या कार्यक्रमाचे आयोजन बिरसा मुंडा क्रांती दल, भगवान काळे (तालुकाध्यक्ष), शारदा वानोळे (तालुकाध्यक्ष महिला फोरम), यांच्या सह अनेक कार्यकर्त्यांनी केले होते.यावेळी हजारो आदिवासी बांधव या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते.