स्व.भोलारामजी कांकरिया यांच्या 47 व्या स्मृती दिनानिमित्त मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर

76

✒️अनिल साळवे(विशेष प्रतिनिधी)मो:-8698566515

गंगाखेड(दि.10डिसेंबर):-स्व.भोलारामजी कांकरिया यांच्या 47 व्या स्मृती दिनानिमित्त आनंद ऋषी नेत्रालय, अहमदनगर व भोलारामजी कांकरिया बहुउद्देशीय चॅरिटेबल ट्रस्ट गंगाखेड च्या संयुक्त विद्यमाने दि.12 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत *”कांकरिया निवास”* नवामोंढा गंगाखेड येथे मोफत नेत्र तपासणी व अल्प दरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी गरजु व्यक्तींनी याचा लाभ घ्यावा.शिबाराचे उदघाटन *श्री जीवराजजी डापकर* साहेब उपविभागीय अधिकारी गंगाखेड यांच्या हस्ते होणार आहे.

रुग्णांनी तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरात येते वेळेस आधारकार्ड,राशनकार्डची झेरॉक्स,फोन नंबर ,चालु असलेली औषधी,पहीले असेल तर डॉक्टरांचे रिपोर्ट हे सोबत घेऊन यावेत. शिबिरात नेत्र भिंग शस्त्र क्रियेसाठी 3000₹ तर फेको लेझर ( लेन्स) शस्त्रक्रियेसाठी 6500₹ लागतील.

प्रवास(अहमदनगर) जाणे येणे, व नाश्ता,जेवण व दोन दिवस राहण्याची सोय मोफत केली जाईल.या शिबिरास नावनोंदणी साठी संपर्क. सिद्धार्थ दर्डा 9158631234; अमर गंगाखेडकर शंकेश धोका रमेश औसेकर मनोज नाव्हेकर भगत सुरवसे अतुल तुपकर रमेशवर भोसले यश गेल्डा प्रदीप लोढा श्यामसुंदर निरस कारभारी निरस यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन मुख्य आयोजिका सौ.मंजुषा दर्डा,पुजा दर्डा यांनी केले आहे.