गंगाखेड मध्ये भैय्यासाहेब आंबेडकर जयंती साजरी

74

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

 गंगाखेड(दि.12डिसेंबर):-डॉ.आंबेडकर चळवळीतील सुर्यपुत्र यशवंतराव उर्फ भैय्यासाहेब भिमराव आंबेडकर यांची जयंती प्रतिमेला पुष्प अर्पण करून साजरी करण्यात आली.

भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा गंगाखेड च्या वतिने विश्वरत्न,महामानव डॉ.बाबासाहेबआंबेडकर यांचे सुर्यपुत्र यशवंतराव उर्फ भैय्यासाहेब भिमराव आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रथम विश्ववृत्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्प अर्पण करूनच भैय्यासाहेब आंबेडकर यांनाही अभिवादन करण्यात आले.

या प्रसंगी बौध्दाचार्य नवनाथ साळवे,रमेश जोधंळे, लखण आण्णा साळवे,चंद्रगुप्त घनसावं,अॅड.कैलास झुझारे,शिध्दोधन सावंत,हैदरखान पठाण, मामु,जिजाराम भालेराव,कांबळे सर,प्रवीण रायभोळे,गजानन पारवे,रावण भालेराव,गोरखनाथ कांबळे प्रमोद डावरे यांचीही उपस्थिती होती.