लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांची जयंती सामाजिक उपक्रमातून साजरी

66

✒️अनिल साळवे(विशेष प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.12डिसेंबर):- महाराष्ट्राच्या मातीतील एक असामान्य राजकीय व्यक्तिमत्व, भारतीय जनता पार्टीचे संघर्षयोध्दा लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे यांच्या 74 व्या जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबीर व शासनांतर्गत च्या योजना” शासन आपल्या दारी “विविध उक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना रामप्रभू मुंडे म्हणाले.

गरीब,वंचित व उपेक्षित घटकांना न्याय देण्यासाठी लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे साहेबांनी केलेला संघर्ष कायम प्रेरणादायी आहे.त्यामुळेच सेवाभाव आपण जोपासला पाहिजे.या प्रसंगी रक्तदान शिबीरात असंख्य कार्यकर्ते व नागरीकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत स्व.गोपीनाथराव मुंडे यांच्या 74 व्या जयंतीनिमित्त आयोजक भारतीय जनता पार्टीचे मा.रामप्रभु मुंढे यांच्या कार्यालयासमोर दि.12 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता आयोजित कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली असून या रक्तदान शिबीरात 74 रक्तदात्यांनी रक्तदान करत सामाजिक बांधिलकी जोपासली.

लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबीर, बरोबरच वत्सल विठाई अस्थिव्यंग शाळेच्या विद्यार्थ्यांना फळ व शैक्षणिक साहित्याचे वाटप, करत प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचे मोफत फॉर्म वाटप करून ऑनलाइन भरण्यात आले. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त महारक्तदान शिबीर कार्यक्रमाचे उद्घाटन भारतीय जनता पाटचे परभणी जिल्हा अध्यक्ष संतोष मुरकुटे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी माजी नगराध्यक्ष रामप्रभु मुंढे,उपविभागीय अधिकारी मा.जिवराज डापकर,विठ्ठलराव रबदडे,ॲड.व्यंकटराव तांदळे, रणधिरराजे भालेराव,श्रीराम मुंढे, बाबुराव पवार, मोहन गित्ते, अर्जून पुरनाळे, गोटू भालके, श्रीनिवास मुंढे,लक्ष्मण लटपटे, रवि जोशी, बापु जोशी, लक्ष्मीकांत जब्दे, बाबासाहेब जामगे, नंदेश्वर बलोरे, मनोहर केंद्रे, प्रशांत फड,सुनिल ठाकूर, बालासाहेब पारवे,अमोल दिवाण, लिंबाजी घोबाळे, इंजि.विनोद शिंदे, दिपक मुरकुटे, तुकाराम तांदळे, अजित जैस्वाल, दिपकभाऊ फड, राहुल कराड, हरिश्चंद्र साबळे, ॲड.पवन कांबळे, विठ्ठल शिंदे, राजेश जाधवर, बालासाहेब सुर्यवंशी, बाळू गव्हानकर, मोहन गीते, अर्जुन पुरणाळे यांच्यासह आदिंची उपस्थित होती.

यावेळी रक्त केंद्र जिल्हा रूग्णालय परभणीचे डॉ.जीवन काळे, डॉक्टर आत्माराम जटाळे, डॉ.किशोर जाधव, डॉ.गोविंद ठमके, डॉ.मारोती सिरगजवार व राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी म्हणून प्रा.डॉ.प्रकास सुर्वे यांच्या सह आदिंनी शिबीरामध्ये परिक्षम घेतले.