पिरंजी येथे सूर्यपुत्र भैय्यासाहेब उर्फ यशवंत यांच्या जयंतीनिमित्त भाषण स्पर्धा उत्साहात संपन्न

41

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि.13 डिसेंबर):-उमरखेड तालुक्यातील पिरंजी येथील बुद्ध विहारांमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सुपुत्र भैय्यासाहेब उर्फ यशवंत यांच्या जयंतीनिमित्त भाषण स्पर्धा चे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाची सुरुवात तथागत भगवान गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भैय्यासाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष राजाराम सुभाष जाधव (शाळा समितीचे अध्यक्ष) तर उद्घाटक म्हणून शामराव नखाते तर प्रमुख पाहुणे म्हणून मारोतराव मुरमुरे, पत्रकार बबलू भालेराव, विजय नखाते, संतोष भावळ ग्रामपंचायत सदस्य, सकाराम धुळे, मल्हारी दवणे हे होते.

भाषण स्पर्धेचे परीक्षक म्हणून सुनील जाधव सर, ज्ञानेश्वर भूसाळे सर, आणि उमरखेड येथील भीम टायगर सेनेचे शहराध्यक्ष तथा पत्रकार सिद्धार्थ दिवेकर यांना आमंत्रित करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पिरंजी गावचे लाडके उपसरपंच अनुभवी पत्रकार मा, शंकर सूळ यांनी केले तर आभार प्रदर्शन भीमशाहीर, समाज प्रबोधनकार वंचित बहुजन आघाडीचे तालुका महासचिव उमरखेड मा. देवानंद पाईकराव यांनी केले.

सूर्यपुत्र यशवंत भीमराव आंबेडकर उर्फ भैय्यासाहेब यांची 111 वी जयंती निमित्त भीमराज मित्र मंडळ पिरंजी यांच्या वतीने भाषण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

शालेय विद्यार्थ्यांना भाषण स्टेज डेरिंग व या माध्यमातून आपल्या महापुरुषांनी केलेली कर्तव्य कार्य आचार विचार विद्यार्थी बालमित्रापर्यंत पोहोचावे त्यांना महापुरुषाने जे कार्य केले बद्दल विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता व्हावी या उद्देशाने भाषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. भाषण ही दोन गटांमध्ये विभागले होते.

पहिला गट वर्ग 1 ते 5 पर्यंत बक्षीस दाते प्रथम बक्षीस वंचित बहुजन आघाडी शाखा पिरंजी यांच्यातर्फे 1001रूपये देण्यात आली आहे. द्वितीय बक्षीस बुद्ध वाशी बाबुराव गंगाराम भालेराव सर स्मृतिप्रीत्याथ सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार बबलू भालेराव 551 रुपये देण्यात आले आहे.

तृतीय बक्षीस सतीश मारोतराव गायकवाड 301 रुपये यांच्या कडून देण्यात आले आहे.

ब गट प्रथम बक्षीस बाबुराव गंगाराम भालेराव सर यांच्या स्मृति प्रित्यर्थ छाया बाबुराव भालेराव यांच्या हस्ते 1001 रुपये चे बक्षीस देण्यात आले आहे.

द्वितीय बक्षीस मल्हारी चंदू दवणे माजी ग्रामपंचायत सदस्य 501 रुपये यांच्या कडून बक्षीस देण्यात आले तर तृतीय बक्षीस पुतळा समिति अध्यक्ष 551 रूपये यांच्याकडून देण्यात आले आहे.

प्रोत्साहन बक्षीस रामा भागोराव दवणे यांच्याकडून सहा स्कूल बॅक देण्यात आल्या आहेत.या भाषण स्पर्धेमध्ये एकूण 33 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.कार्यक्रमाचे आयोजक भीमराज मित्र मंडळ पिरंजी, धम्मपाल पाईकराव, अमोल पाईकराव, सतीश गायकवाड, अविनाश पाईकराव, गंगाराम दवणे धम्मपाल पंडित, नाना धुळे रामजी प्रभाकर पाईकराव इत्यादी अनेक कार्यकर्त्यांनी केले होते.यावेळी गावातील गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.