विधानसभेत मोर्शी वरूड तालुक्यातील शेतकऱ्यांचे व विकासाकामांचे प्रश्न गाजले !

655

🔸आमदार देवेंद्र भुयार यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर वेधले शासनाचे लक्ष !

✒️वरूड(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

नागपूर(दि.13डिसेंबर):-येथील हिवाळी अधिवेशनात आमदार देवेंद्र भुयार यांनी मतदार संघातील शेतकऱ्यांच्या समस्या, मोर्शी वरूड तालुक्यातील रखडल्याचे प्रश्न उपस्थित करून मतदार संघातील विवीध प्रश्नावर आमदार देवेंद्र भुयार यांनी धरले सरकारला धारेवर धरले. मोर्शी वरूड तालुक्यातील विविध प्रश्न आमदार देवेंद्र भुयार यांनी यांनी विधान सभेत उचलून धरले. मोर्शी वरूड तालुक्यामध्ये २६ ते ३० नोव्हेंबर दरम्यान झालेल्या अवकाळी पाऊस सोसाट्याच्या वाऱ्यामुळे नुकसान झालेल्या संत्रा, मोसंबी, कापूस, सोयाबीन, तूर, भाजीपाला यासह विविध उत्पादन घेणाऱ्या शेकऱ्यांना पिकांची हेक्टरी १ लक्ष रुपये नुकसान भरपाई डिसेंबर महिन्यात देण्यात यावी .

जून २३ चे रिद्धपुर, अंबाडा महसूल मंडळातील झालेल्या शेती मालाच्या नुकसानीचे पैसे तसेच बेनोडा, हिवरखेड मंडळ व टेम्भुरखेडा मंडळातील गारपिटीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावे, २२-२३ च्या संत्रा आंबिया बहाराचे १९३० शेतकऱ्यांनचे नुकसानीचे कंपनीने थकविलेले हप्त्ते त्वरित शेतकऱ्यांना वितरित करण्यात यावे. पवार, शिकलंकरी समाजाच्या लोकांना शिक्षणासाठी, नोकरी साठी, शासकीय योजनेसाठी जात प्रमाणपत्र व जातवैद्यता प्रमाणात देण्यात यावे.

वरुड मोर्शी तालुक्यातील प्रकल्पग्रस्त बांधवासाठी विशेष पॆकेज देण्यात यावे, बुळीत क्षेत्रा बाहेरील जमिन प्रकल्पग्रस्तना वाहिवाटी करीता देण्यात यावी, कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय सेवेत घेण्यात यावे. महेंद्री जंगलाला संवर्धन राखीव न करता वन्यजीव अभयारण्य करण्यात यावे सर्व गावाच्या जमिनीचे संपादन करण्यात यावे व गावकऱ्यांना व शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला देण्यात यावा यासह विवीध मुद्दे आमदार देवेंद्र भुयार यांनी उपस्थित केले.