75 % पेक्षा कमी हजेरी असणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेला उपस्थित राहण्याची अनुमती द्यावी : किरण कांबळे, प्रदेशाध्यक्ष, भा. वि. मोर्चा

121

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

🔸छ.शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर कुलगुरूना दिले पत्र

म्हसवड(दि.20डिसेंबर):-75% पेक्षा कमी हजेरी असणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेस बसू दिले जाणार नाही या परिपत्रकच्या वीरोधात आज भारतीय विध्यार्थी मोर्च्याचे प्रदेशाध्यक्ष किरण कांबळे यांनी कुलगुरू यांना पत्र दिले आणि सदर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन या पत्राद्वारे केले

सदर पत्रात किरण कांबळे यांनी म्हटले आहे कि छ. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर या विद्यापीठाशी संलग्न असलेल्या विधी महाविद्यालयांच्या परीक्षा पुढील महिन्यापासून सुरू होत आहेत. ज्या विद्यार्थ्यांची महाविद्यालयातील हजेरी ७५ % पूर्ण असेल त्याच विद्यार्थ्यांना सदर परीक्षांना बसता येणार असल्याबातचे परिपत्रक आपल्या विद्यापीठाद्वारे प्रसिद्ध करण्यात आले आहे. परंतु ज्या विद्यार्थ्यांना काही अपरिहार्य कारणांमुळे अथवा अडचणींमूळे सदर ७५% ची अट पूर्ण करणे शक्य झालेले नाही त्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू न दिल्यास त्यांचे अपरिमित शैक्षणिक नुकसान होणार आहे.

तसेच ज्या विद्यार्थ्यांना ईच्छा असतानाही अपरिहार्य कारणांमुळे ७५% हजेरीची अट पूर्ण न केल्यामुळे परीक्षा देता न आल्यास होणाऱ्या शैक्षणिक नुकसानाने त्यांच्यावर मानसिक दडपण येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी ज्या विद्यार्थ्यांना मेडिकल अथवा तत्सम अपरिहार्य कारणांमुळे ७५% हजेरीची अट पूर्ण करता आली नाही अशा विद्यार्थ्यांच्या बाबतीत विद्यापीठाद्वारे सहानुभूतीपूर्वक विचार केला गेल्यास त्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळता येणे शक्य आहे.

तरी या पत्राद्वारे भारतीय विद्यार्थी मोर्चा या विद्यार्थी संघटनेद्वारे आपल्याला विनंती करण्यात येते की, ज्या विद्यार्थ्यांना मेडिकल,कौटुंबिक अथवा तत्सम अपरिहार्य कारणांमुळे ७५% हजेरी पूर्ण करता आली नाही अशा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून सहानुभूतीपूर्वक विचार होऊन त्यांना परीक्षा देण्याची संधी देण्यात यावी. तसेच आपल्याद्वारे तशा प्रकारे सूचना आपल्या विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांना देण्यात याव्यात.तसेच अपल्याद्वारे या पत्रावर करण्यात आलेल्या कार्यवाहीची माहिती bharatiyavidyarthimorcha@gmail.com
या ई-मेल वर आम्हाला देण्यात यावी