अत्यंत कठीण परिस्थितीत एस.एस.सी. परीक्षेत कु.ललिता सुरेशराव शेंडे नेरीतून प्रथम

12

✒️चिमुर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चिमुर(दि.30जुलै):-)नेरी येथील रहिवासी श्री सुरेशराव शेंडे व त्यांची पत्नी सौ.सरिता सु. शेंडे अत्यंत हलाखीचे जीवन जगत असताना घरात अठरा विश्व दारिद्र्य अशा परिस्थितीत आपल्या लाडक्या मुलीला त्यांनी शिकवले. कुमारी ललिता सुरेशराव शेंडे हिने आपल्या आई-वडीलाच्या कष्टाचे चीज करून ती सरस्वती कन्या विद्यालय, नेरी तालुका-चिमूर येथून एस.एस.सी बोर्डाच्या परीक्षेत 91 टक्के गुण मिळवून नेरी गावातून प्रथम येण्याचा मान मिळवला.
ललिताने आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, संस्थेचे सचिव श्री. संजयभाऊ डोंगरे, मुख्याध्यापिका कुमारी ए.ए. अटाळकर, वर्गशिक्षक श्री. एस. एस.शेंडे व सर्व शिक्षक वृंदाना दिले.