गेवराईतील कृषी प्रदर्शनात आजपासून शेतकऱ्यांसाठी हेलिकॉप्टर राईड

393

✒️बीड,जिल्हा प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

बीड(दि.22डिसेंबर):-यंदा कृषी प्रदर्शनाच्या निमित्ताने आपल्या शेतात राबणारा बळीराजा कबाड कष्ट करतो, मात्र त्याला कोणतीही मौज मजा करता येत नाही. शेतकऱ्यांच्याही जीवनात आनंद द्विगुणित करण्यासाठी शेतकऱ्यांना कृषी प्रदर्शनानिमित्त अल्प दरात हेलिकॉप्टरची सफर करण्यास मिळणार आहे.

तेही गेवराई शहरात यामुळे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचे स्वप्न हेलिकॉप्टरमध्ये बसण्याचे पूर्ण होणार असून या गेवराई शहरातील कृषी प्रदर्शनात शेतकऱ्यांसाठी अल्प दरात ही हेलिकॉप्टर राईट सुरू होणार असून गेवराई तालुक्यातील शेतकरी बांधवांनी आजच आपली बुकिंग करून याचा लाभ घ्यावा असे आव्हान संयोजक महेश बेंदरे यांनी केली आहे