शेतमाल मूल्यवर्धित करून विक्री करण्याची संधी प्राप्त झाली…डॉ. पंकज आशिया

92

✒️महागाव,ता. प्र.(किशोर राऊत)

महागाव(दि.24डिसेंबर):-तालुक्यातील ऊटी या छोट्याशा गावी यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी दि. 20 डिसेंबर 2023 रोजी भेट दिली. यादरम्यान रखमाई स्पाईस अँड ऍग्रो फुड्स या उद्योग समूहास भेट देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

मा. जिल्हाधिकारी यवतमाळ डॉ. पंकज आशिया , उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड तसेच महागावचे तहसीलदार जी.एम. राठोड, तालुका कृषी अधिकारी शिवनेरी चव्हाण , गट विकास अधिकारी ज्ञानेश्वर टाकरस , व इतर विभागाचे अधिकारी कर्मचारी यांनी यावेळी सदर रुखमाई प्रतिष्ठान ला भेट दिली.

परिसरातील शेतकरी बांधवांना त्यांचा शेतमाल मूल्यवर्धित करून विकण्यास संधी निर्माण झाल्याचे व्यक्त करून जिल्हाधिकारी यांनी कौतुक करून प्रोत्साहित केले. शेतकऱ्यांनी आपला उत्पादित शेतमाल प्रक्रिया करूनच विक्री करावी जेणेकरून आर्थिक चांगला फायदा होऊन उत्पन्न वाढीस मदत होईल.

जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या भेटीने ऊटी येथील गटाचे सर्व सदस्यांना प्रोत्साहन ऊर्जा मिळाली आहे.उत्साहाने अणि जोमाने काम करून सदर युनीट प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत उभारले असुन यामधे शासनाकडून 35% अनुदान देण्यात आले. या प्रकल्पातून दर वर्षी सरासरी 3 लाख रुपये निव्वळ नफा मिळत आहे. वार्षिक उलाढाल 15-20 लाखां पर्यंत होत असल्याची प्रतिक्रिया यावेळी रखमाई मसाले उत्पादन प्रक्रिया गटाचे संचालक गणेशराव गावंडे यांनी आमचे प्रतिनिधी विश्वनाथ महामुने यांच्याशी वार्तालाप करताना स्पष्ट केले.