२४ डिसेंबर रोजी अमरावतीला अखिल भारतीय शिव मराठी साहित्य संमेलन

184

🔸डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त आयोजन

✒️अमरावती(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

अमरावती(दि.23डिसेंबर):-राष्ट्ररत्न बॅरिस्टर पंजाबराव देशमुख यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त शिवशरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर व मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालय अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने आज दि .२४ डिसेंबर २०२३ रोजी तिसऱ्या अ.भा. शिवमराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. संमेलनाचे उद्घाटन श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धनजी देशमुख करणार आहेत. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक व समीक्षक अखिल भारतीय साहित्य महामंडळ मंडळाचे विश्वस्त व जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषद परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष डॉ. सतीश तराळ असून संमेलनाच्या स्वागताध्यक्ष महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. स्मिता देशमुख आहेत.

संमेलनाचे कार्याध्यक्ष युवा संस्थेचे अध्यक्ष नितीन पवित्रकार, संमेलनाच्या संयोजक मराठी विभाग प्रमुख डॉ.मंदा नांदुरकर, संमेलनाचे निमंत्रक डॉ. मंगेश निर्मळ हे आहेत. संमेलनात प्रमुख अतिथी म्हणून विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष श्री प्रदीप दाते, ज्येष्ठ लेखक व संपादक डॉ. सुधीर भोंगळे, शिवाजी शिक्षण संस्थेच्या कार्यकारिणीची सदस्य श्री हेमंत काळमेघ, जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. सुभाष बागल आदी मंडळी उपस्थित राहणार आहेत.

“डॉ.पंजाबराव देशमुख यांचे क्रांतिकारी कार्य” या विषयावर होणाऱ्या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी डॉ. सुभाष सावरकर राहणार असून कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य राज यावलीकर राहणार आहेत. कथाकथनाच्या अध्यक्षस्थानी अभिनेत्री मेघना साने, मुंबई या राहणार असून संमेलनात सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

संमेलनात उज्जैनकर फाउंडेशन तर्फे दिल्या जाणाऱ्या साहित्य पत्रकारिता व समाजकार्य या क्षेत्रातील पुरस्कारांचे वितरणही होणार आहे. हे संमेलन गाडगे बाबा समाधी मंदिर अमरावती संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक मंडळ अमरावती व श्री गुरुदेव सेवाश्रम ट्रस्ट राधा नगर अमरावती यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले आहे.