गंगाखेड येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मनुस्मृति दहन दिन साजरा

306

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.25डिसेंबर):-स्वातंत्र्यपूर्व काळात मनस्मृतीच्या आधारे विषमतावादी समाज रचना अस्तित्वातअसताना 25 डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन करत संपूर्ण देशामध्ये समानता आणण्यासाठी सुरुवात केली होती याच दिनाचेऔचित्य साधून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तालुकाध्यक्ष आकाश पारवे यांच्या नेतृत्वाखाली प्रथम डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करूनअभिवादन करण्यात आले.

तसेच डॉ.बाबासाहेबआंबेडकर चौकामध्ये 25 डिसें.मनुस्मृती दहन दिन साजरा करत असताना विषमतावादी मनुस्मृतीचा धिक्कार करत प्रतिकात्मक(मनुस्मृती)चे कागद जाळत निषेध व्यक्त “मनुस्मृतीचा धिक्कार असो”अशा घोषणा देत निषेध करण्यात आला याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष आकाश पारवे, रोहिदास लांडगे यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव मनोहर वावळे,युवा जिल्हा उपाध्यक्षआकाश गायकवाड,युवा तालुका अध्यक्ष श्रीकांत कदम,शहराध्यक्ष सय्यद बिलाल,तालुका सचिव आनंद साळवे,सुनील सोळंके,गजानन पारवे,अमोल कांबळे,रोहिदास लांडगे,अविनाश जगतकर,पत्रकार अनिल साळवे,अशोक वावळे,मिलिंद साळवे,पत्रकार राहुल साबणे, विजय साळवे,शेख जावेद, अलीम कुरेशी,हरिभाऊ गायकवाड,नेहाल पठाण,अजय गंगासागरे,सलमान शेख, देवानंद डबडे,संघपाल पंडित,इत्यादींची उपस्थिती होते.