करजगाव येथे २ कोटी ८८ लक्ष रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन संपन्न !

224

🔸ग्रामीण भागात विकासाला गती देण्यासाठी कटिबद्ध — आमदार देवेंद्र भुयार

✒️वरूड(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

वरूड(दि.26डिसेंबर):-तालुक्यातील करज गाव येथे आमदार देवेंद्र भुयार यांनी विवीध योजने अंतर्गत २ कोटी ८८ लक्ष रुपयांच्या निधीची तरतुद करुन देण्यात आली असून या सर्व विकासकामांचा भूमिपूजन, लोकार्पण सोहळा आमदार देवेंद्र भुयार यांच्या हस्ते पार पडला.

शासनाच्या योजना गावांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करतांना गावातील गरजा आणि ग्रामस्थांच्या प्रमुख मागण्या ध्यानात घेऊन विकास कामे करण्याचा प्रयत्न असून ग्रामविकासाला चालना देण्यासाठी ग्रामीण भागात विविध पायाभूत सुविधांच्या उभारणीतून विकासाला गती देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी करजगाव येथे केले.

मतदार संघातील वरूड तालुक्यातील ग्राम करजगाव येथे ग्राम करजगाव ते लोणी पर्यंत रस्त्याकरीता २ कोटी ३७ लक्ष रूपये निधीची तरतुद करून देण्यात आली आहे करिता भूमिपुजन करण्यात आले, ग्राम करजगाव येथे तलाठी कार्यालय बांधकाम करिता 21 लक्ष रुपये निधीची तरतुद करून देण्यात आली असून सदर काम पूर्णत्वास गेले असून लोकार्पण सोहळा पार पाडण्यात आला, ग्राम करजगाव गुलाब लोखंडे ते दसन उईके यांच्या घरापर्यंत काँक्रिट रस्ता बांधकाम करण्या करिता 10 लक्ष रुपये निधीची तरतुद करून देण्यात आली असुन लोकार्पण सोहळा पार पाडण्यात आला.

ग्राम करजगाव येथे कमला पचारे ते दिलीप पचारे यांच्या घरापर्यंत काँक्रिट रस्ता बांधकाम करण्या करिता 10 लक्ष रुपये निधीची तरतुद करून देण्यात आली असुन लोकार्पण सोहळा पार पाडण्यात आला, ग्राम करजगाव येथे नर्मदा सिसोदिया ते शंकर बोहरुपी यांच्या घरापर्यंत काँक्रिट रस्ता बांधकाम करण्या करिता 10 लक्ष रूपये निधीची तरतुद करून देण्यात आली असुन लोकार्पण सोहळा पार पाडण्यात आला असून यासह आदी विकास कामांसाठी भरीव निधीची तरतुद करुन भूमिपूजन सोहळा व लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

यावेळी मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार, यांच्यासह सरपंच, उपसरपंच, ग्राम पंचायत सदस्य व शेकडो नागरिक पदाधिकारी उपस्थित होते.