छावा युवा संघटनेच्या आध्यात्मिक आघाडी प्रदेशाध्यक्ष पदी कृष्णा महाराज राजुरकर यांची निवड

222

✒️नांदेड(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

नांदेड(दि.26डिसेंबर):-अन्यायाचा प्रतिकार करत समाजकार्य सदैव अग्रेसर असणाऱ्या छावा युवा संघटनेच्या आध्यात्मिक आघाडी प्रदेशाध्यक्ष पदी प्रसिद्ध किर्तनकार भागवताचार्य कृष्णा महाराज पाटील राजुरकर यांची आज श्री श्री श्री 108 महंत शांतीब्रह्म यदुबनजी गुरु गंभीरबनजी महाराज मठ संस्थान श्री क्षेत्र कोलंबी यांच्या हस्ते पत्र देऊन नियुक्ती करण्यात आली….

छावा युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा व्यंकोजीराजे भोसले यांचे वंशज सरसेनापती बाबासाहेबराजे भोसले पाटील यांच्या आदेशानुसार प्रदेशाध्यक्ष राजेश पाटील मोरे यांनी छावा युवा संघटनेची श्री क्षेत्र कोलंबी येथे आध्यात्मिक आघाडीची स्थापना करण्यात आली.
यावेळी श्री संत साहेबराव महाराज श्री संत दयाळबन महाराज,श्री संत बसव्दबन महाराज,गोपाळ महाराज यांच्यासह कोलंबी संस्थानातील सर्व सांधु संत व भाविक भक्त मंडळींनी महाराजांचे अभिनंदन केले…