गंगाखेड येथे ३०२ कामगारांना सुरक्षा कीटचे वाटप

96

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.2जानेवारी):-अंगमेहनत करून उदरनिर्वाह करणारे कामगार नेहमी जोखमीचे काम करीत असतात. म्हणून त्यांना दैनंदिन कामात मदत व्हावी, या हेतूने महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने मोफत देण्यात येणारी कीट हि केवळ वस्तूंचा संग्रह नसून ते कामगारांच्या जीवनाला संरक्षण देणारे कवच आहे, असे प्रतिपादन गंगाखेड विधानसभेचे आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी केले.

आ.डॉ.रत्नाकर गुट्टे संचलित शासकीय योजना मदत केंद्राच्या वतीने शहरातील पूजा मंगल कार्यालय येथे आयोजित कामगार सुरक्षा कीट वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी तब्बल ३०२ पात्र कामगारांना सुरक्षा कीटचे थेट लाभ मिळाला.

पुढे आ.डॉ.गुट्टे म्हणाले की, सर्वसामान्य कामगारांचे जीवनमान उंचावावे, यासाठी केंद्र आणि राज्य सरकार वेगवेगळ्या स्तरावर प्रामाणिक प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडील नोंदीत बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबिय यांच्यासाठी अपघाती विमा, प्रसुती झाल्यास आर्थिक मदत, पाल्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती, कन्येच्या विवाहास मदतीसह अन्य कल्याणकारी योजना राबविल्या जातात. कामगारांच्या सुरक्षेसाठी सुरक्षा संच मोफत पुरविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे कामगार बांधवांना मोलाची मदत होत आहे. दररोज लागणाऱ्या आवश्यक वस्तुंची कीट मिळाल्याने कामगार सुध्दा आनंदी होत आहेत. परिणामी, हि योजना दुरदृष्टीचे द्योतक आहे.

सर्वसामान्य कामगारांना दिलासा देणाऱ्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्र समन्वयक अभिजीत चक्के तर सूत्रसंचालन कवी विठ्ठल सातपुते यांनी केले. तसेच आभार प्रभाकर सातपुते यांनी व्यक्त केले. यावेळी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रल्हादराव मुरकुटे, रासपा जिल्हाध्यक्ष ॲड.संदीप आळनुरे, तहसिलदार प्रदिप शेलार, गट विकास अधिकारी जयराम मोडके, पालम तालुका प्रभारी माधवराव गायकवाड, गंगाखेड तालुका प्रभारी हनुमंत मुंडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संभुदेव मुंडे, माजी नगरसेवक नागनाथ कासले, बालासाहेब ढोले, वैजनाथराव टोले, उध्दव शिंदे, संदीप राठोड, संतोष पेकम, प्रताप मुंडे, संजय पारवे, पत्रकार पिराजी कांबळे, चंद्रकांत गायकवाड यांच्यासह जमलेले सर्व बांधकाम कामगार व माता-माऊली मोठया संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वरिष्ठ लिपिक शाम ठाकूर, ऋषिकेश बनवसकर, गोपी नेजे, ॲड.सचिन राठोड, सिध्देश्वर फड, बालाजी मुंढे, गोविंद टरपले, शिवशंकर मुंढे, प्रदीप गायकवाड, अश्विन कदम, गणेश मिजगर, दुर्गेश वाघ, राहूल गायकवाड, नामदेव गायकवाड यांच्यासह सर्व कार्यालयीन कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.