श्री संत जनाबाई महाविद्यालयाची विद्यार्थीनी अनुसया वाळके हिची राष्ट्रीय युवक महोत्सवासाठी निवड

104

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.2जानेवारी):-श्री संत जनाबाई महाविद्यालय गंगाखेड येथील वर्ग बारावीची खेळाडू विद्यार्थिनी अनुसया प्रभाकर वाळके हिने 28 ते 31 डिसेंबर दरम्यान उदगीर येथे झालेल्या राज्यस्तरीय युवक महोत्सवमध्ये वस्त्रोद्योग या प्रकारामध्ये शिवणकला यासाठी प्रथम पारितोषिक मिळवत नाशिक येथे होणाऱ्या राष्ट्रीय युवक महोत्सवासाठी पात्र ठरली आहे. अनुसया ही एक उत्कृष्ट खो-खो ची खेळाडू असून क्रीडा क्षेत्रासोबतच युवक महोत्सवात सहभागी होत तिने हे यश संपादन केले आहे. अनुसया तिला मार्गदर्शक म्हणून तिचे क्रीडा शिक्षक प्राध्यापक चैतन्य पाळवदे सर यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

श्री संत जनाबाई महाविद्यालयातर्फे अनुसया वाळके चा सत्कार करण्यात आला यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ बीएम धुत सर, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य संतोष गायकवाड सर , भारत हत्तीआंबिरे सर, खळीकर सर व प्रा चैतन्य पाळवदे सर उपस्थित होते. तसेच उपप्राचार्य डॉ दयानंद उजळंबे सर व उपप्राचार्य आणि क्रीडा संचालक डॉ चंद्रकांत सातपुते सर यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

अनुसयाच्या या यशासाठी व राष्ट्रीय स्पर्धेसाठी श्री संत जनाबाई संस्थेचे अध्यक्ष आदरणीय आत्माराम टेंगसे सर , तसेच सचिव आदरणीय ॲड. संतोष मुंडे सर तसेच सर्व संस्था चालक यांनी शुभेच्छा दिल्या