पंकजाताई उघडा डोळे बघा नीट, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत १३ कोटींच्या ठिगळाच्या रस्त्यावर गुडघाभर भगदाड – डॉ.गणेश ढवळे

428

✒️बीड,जिल्हा प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

बीड(दि.2जानेवारी):-मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था बीड यांच्या मार्फत पालवण चौक ते लिंबागणेश रस्त्यावर १२ कोटी ७५ लाख रुपये निधी खर्च करण्यात आला.मात्र ठेकेदार कंपनीने निकृष्ट रस्ता काम केल्याने २ वर्षातच रस्त्याचे तिन तेरा वाजल्याचे दिसत आहे. महायुती सरकारच्या कार्यकाळात तत्कालीन ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांनी ग्रामविकास मंत्री असताना ग्रामीण भागातील दळणवळणाची साधने म्हणून मोठ्या प्रमाणावर निधी आणला त्यातुन ताईंच्या कार्यकर्ते यांनी निकृष्ट दर्जाची कामे करून निधी घशात घातला.सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या तक्रारीनंतर रसत्याला ठिगळ लाऊन थातुरमातुर डागडुजी करण्याचा प्रयत्न सुरूच आहे.

महायुती सरपालवण चौक भाळवणी मार्गे ते लिंबागणेश हा २४ किलोमीटर रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत ग्रामीण रस्ते विकास संस्था बीड या विभागामार्फत अंदाजे किंमत १३ कोटी रूपयांच्या खर्चातुन केला असुन हा रस्ता एम.टी.मस्के कन्स्ट्रक्शन मार्फत करण्यात आला असुन भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांचे थोरले बंधु मदन मस्के यांनी केलेला असुन २ वर्षातुन ३ वेळा डागडुजी करण्यात आली आहे. एम.टी.मस्के कन्स्ट्रक्शन चे खडीक्रशर याच रस्त्यावर असल्याने आणि निकृष्ट दर्जाचा रस्ता केलेला असुन रस्त्याची अशी दुरावस्था झाली आहे.

लिंबागणेश सर्कल मधील ग्रामस्थांनी पालवण चौकात रास्ता रोको आंदोलन केले होते
————————————-
वरील निकृष्ट दर्जाच्या रस्ता प्रकरणी कंत्राटदार आणि महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास यंत्रणा बीड अभियंता यांच्यावर चौकशी करून कारवाईसाठी दि.७ ऑगस्ट २०२३ रोजी या मार्गावरील ग्रामस्थांनी पालवण चौकात पालवण, आहेर धानोरा वरवटी,भाळवणी, पोखरी (घाट) ,पिंपरनई,बेलेश्वर , सोमनाथ वाडी येथील ग्रामस्थांनी रास्तारोको आंदोलन केले होते.यावेळी स्वप्निल गलधर,बबन माने, गणेश बहिरवाळ, अर्जुन बहिरवाळ,सचिन कोटुळे, बप्पासाहेब फाळके,प्रदीप कोटुळे, पंडीत तुपे,अशोक येडे, नितिन सोनावणे, शेख युनुस , विठ्ठल गुजर,प्रकाश फाटक, मधुकर पाटील,शेख अख्तर सह ग्रामस्थ सहभागी झाले होते.

दुर्दैवी अपघात झाल्यास कंत्राटदारावर गुन्हे दाखल करणार:- डॉ.गणेश ढवळे
————————————
लिंबागणेश ते पालवन रस्त्यावरील लिंबागणेश परीसरात रस्त्याच्या कडेला गुडघाभर भगदाड पडले असुन रस्त्याची डागडुजी करताना जाणिवपूर्वक याकडे दुर्लक्ष केल्याने भविष्यात दुर्दैवी अपघाताची घटना घडल्यास कंत्राटदारावर गुन्हे दाखल करण्यात येतील याची त्यांनी नोंद घ्यावी.