मा.सुधीर महाजन एक आदर्श प्राचार्य

170

शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणणारे शिक्षणतज्ज्ञ,आदर्श आणि गुणवंत विद्यार्थी घडविणारे बेस्ट प्राचार्य, भव्यदिव्य शाळेचे प्रशासन चोखपणे सांभाळणारे कुशल प्रशासन,सकारात्मक नेतृत्वगुण असणारे स्वआयुष्य शिक्षण क्षेत्राला समर्पित करून सामाजिक बांधिलकी स्वीकारणारे प्रभावी व्यक्तिमत्त्व, फुले-शाहू-आंबेडकरी विचारधारा समाजापर्यंत पोहोचवणारे पुरोगामी विचारवंत प्राचार्य श्री सुधीर महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा परिचय व्हावा, यासाठी हा लेख प्रपंच.

” हम भी दरिया है,
हमे अपना हुनर मालूम है,
जिस सरजमी पर चल पडेंगे
रास्ता हो जायेगा “

उपरोक्त ओळी ज्यांच्यावर समर्पक वाटतात,उपस्थितीने सदैव प्रसन्नतेचा अनुभव आणणारे,सकारात्मकतेच्या तेजाने इतरांचे जीवन प्रकाशमय करणारे,सदैव तरुणांना मार्गदर्शन करणारे तसेच बालकांपासून तर आबाल वृद्धांच्या मनावर अधिराज्य गाजवीत त्यांच्या गळ्यातील ताईत बनलेले सर्वगुणसंपन्न बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणजे पोदार इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य श्री सुधीर महाजन.उच्चविद्या विभूषित ‘शिक्षणतज्ज्ञ’ पुरस्काराने सन्मानित सुधीर महाजन यांचा जन्म दि.४ जानेवारी १९७७ मध्ये मध्यप्रदेशमधील बुऱ्हाणपूर जिल्ह्यातील शिक्षकांचे गाव या नावाने प्रसिद्ध अशा बंभाडा गावामध्ये झाला.आई द्रौपदाबाई शिक्षिका तसेच वडील लक्ष्मणजी महाजन हे मुख्याध्यापक असल्याने आपल्याला शैक्षणिक गुणवत्ता तसेच नेतृत्व क्षमतेचे बाळकडू लहानपणात घरामधूनच मिळाले.

 ” द्रौपदी – लक्ष्मण ।
माता आणि पिता ॥
सुसंस्कार दाता ।
सुधीरचे ॥ “

उच्च बुद्धिमत्तेच्या जोरावर शालेय तसेच महाविद्यालयीन शिक्षणात सदैव गुणवत्ता यादीमध्ये राहून व्यवसाय प्रशासन,शिक्षणशास्त्र, समाजसेवा,अर्थशास्त्र, भौतिकशास्त्र तसेच पत्रकारिता अशा एकूण तब्बल ६ विषयामध्ये सुवर्ण पदक अर्जित करत शिक्षण पूर्ण केले.

” सुधीरांना होता ।
नाद अभ्यासाचा ॥
हाच प्रगतीचा ।
महामंत्र ॥ “

आपण व्यवसाय प्रबंधन विषयातील पदव्युत्तर शिक्षण ग्वालियरच्या त्या महाविद्यालया तून अर्जित केले जेथे भारताचे भूतपूर्व प्रधानमंत्री मा. अटलबिहारी वाजपेयी तसेच कवी शिवमंगलसिंग सुमन हे स्वतः विद्यार्थी राहिले. आपल्या उच्च गुणवत्ता,अथक परिश्रम, कर्तव्यनिष्ठ वृत्ती तसेच शिक्षणक्षेत्राविषयीची विशेष रुची लक्षात घेत न्यू व्हिजन हायर सेकेंडरी स्कूल,बुऱ्हाणपूर मध्यप्रदेश मध्ये सरांची वयाच्या २३ व्या वर्षी प्राचार्य पदावर निवड करण्यात आली. शिक्षणक्षेत्राबद्दल असीम निष्ठा, दृढनिश्चय तसेच समर्पित भावनेने आपल्या कर्तव्यांचे पालन करीत आपल्या कार्यकाळात संस्थेने गगन भरारी घेत उत्कृष्ठ निकाल देत संस्था तसेच बुऱ्हाणपूर शहराचे नाव उज्ज्वल केले.याच कार्याची दखल घेत तत्कालीन महामहिम राज्यपाल तसेच मुख्यमंत्री (मध्यप्रदेश) कार्यालयाद्वारे आपल्याला २००१-२००२ मध्ये सन्मानित करण्यात आले. त्यानंतर आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त संस्था मॅक्रो व्हिजन अकॅडेमी, बुऱ्हाणपूर चे अध्यक्ष सन्माननीय आनंद प्रकाश चौकसे यांनी आपल्यातील नेतृत्वक्षमतेला हेरून प्राचार्यपदी नियुक्त केले. येथील ११ वर्षाच्या कार्यकाळात आपण शिक्षणक्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल करीत संस्थेच्या परीक्षा निकालांनी नवनवीन कीर्तीमान स्थापित केले,याच कीर्तीमानांची दखल घेत आपणास २०१२ मध्ये ‘शिक्षणतज्ज्ञ’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

” ज्ञान मंदिरात ।
सुधीर शिक्षक ॥
तेजस्वी रक्षक ।
संस्कृतीचे ॥ “

श्री सुधीर महाजन यांनी बिम्पट्स कॉलेज,बुऱ्हाणपूर येथे प्रशासकीय संचालक हे पद उत्कृष्ट प्रशासनाने सुशोभित केले.शिक्षणक्षेत्रातील आपल्या कार्यकक्षेच्या मर्यादा अधिक वृद्धिंगत करीत महाराष्ट्रातील अमरावती शहराच्या पोदार इंटरनॅशनल स्कूल अमरावती येथे प्राचार्य पदी रुजू झाले.पोदारच्या अभ्यासक्रमाचा गंधही नसलेल्या अमरावती शहरांमधे पदार्पण करीत १२ वर्षाच्या कार्यकाळात पोदार इंटरनॅशनल स्कूल खऱ्या अर्थाने नावारूपाला आणली आणि अमरावती शहरातीलच नव्हे तर विदर्भातील सर्वात मोठी शाळा बनण्याचा बहुमान आपल्याच नेतृत्वात आज मिळाला आहे.हे आपल्या कुशल प्रशासनाची पावती आहे.आदर्श विद्यार्थी घडविण्याचे थोरांचे स्वप्न तुम्ही पोदार मधून साकार करीत आहात याचा सर्वांनाच आनंद होत आहे.

” महाजन सर ।
पूजक तत्त्वांचे ॥
शाळा प्रगतीचे ।
दीपस्तंभ ॥ “

शिक्षणक्षेत्रातील आमूलाग्र बदल घडवित विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय बाळगत कार्यतत्पर राहण्याच्या आपल्या जीवनशैलीने प्रभावित होत आपणास विविध शासकीय, निमशासकीय तसेच खाजगी संस्थांकडून सन्मानित करण्यात आले आहे.राज्यपाल तसेच मुख्यमंत्री (मध्यप्रदेश) तर्फे डॉ.आंबेडकर सन्मान पुरस्कार -२००२,समाज सौरभ पुरस्कर – २००३,डॉ.राधाकृष्णन पुरस्कार – २००७,महाराष्ट्र आणि गोवा झोन तर्फे बेस्ट प्रिंसिपल अवॉर्ड, -२०१२,मुख्यमंत्री व शालेय शिक्षण कार्यालय महाराष्ट्र तर्फे महात्मा फुले शिक्षणतज्ज्ञ पुरस्कार २०१३,ग्लोरी ऑफ इंडिया अवॉर्ड -२०१४,बेस्ट सिटीझन ऑफ इंडिया अवॉर्ड २०१४,समाज भूषण अवॉर्ड २०१४,शिक्षा भूषण अवॉर्ड २०१५,सर्टिफिकेट ऑफ एक्ससिलेन्स अवार्ड -२०१७, फायनान्सियल विझार्ड अवॉर्ड -२०१७,प्रोग्रेसिव्ह प्रिंसिपल ऑफ इंडिया अवॉर्ड -२०१७,शिक्षण उपसंचालक अमरावती द्वारे सन्मान -२०१७,ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले शिक्षण गौरव पुरस्कार -२०१८,एक्ससेलेन्स इन एंवीरोन्मेन्ट एज्युकेशन अवॉर्ड २०१८,विद्याभूषण अवॉर्ड -२०२१ टेक्नो एक्सेलेन्स अवॉर्ड -२०२१ ऍक्टिव्ह प्रिंसिपल अवॉर्ड -२०२१ ज्ञानगुरू – द करियर मोल्डर – २०२२,बेस्ट प्रिंसिपल महाराष्ट्र आणि गोवा झोन -२०२३ इत्यादी पुरस्कार तसेच विभिन्न राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील मंचावर शिक्षण,समाज जागृती, पर्यावरण संरक्षण-संवर्धन इत्यादी विषयांवरील उद्बोधनासाठी सरांना सन्मानित करण्यात आले आहे.

शिक्षणक्षेत्राबरोबरच सामाजिक कार्यामध्ये श्री महाजन सर नेहमीच अग्रेसर राहून सामाजिक बांधिलकी जोपासण्यात शीर्षस्थानी आहेत. फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांना आदर्श मानत आपली जीवनशैली “साधी राहणी, उच्च विचार सरणी” या उक्तीप्रमाणे दिसून येते.सामाजिक उपक्रमामध्ये सदैव अग्रेसर राहत समाजोपयोगी बाबीमध्ये तन-मन-धनाने आपले योगदान सतत लाभते.सामाजिक बांधिलकीसोबतच आपला साहित्याविषयीचा व्यासंग आपल्या व्यक्तिमत्वाला अजूनच विशेष बनवितो.शिक्षणक्षेत्रामध्ये असल्याने वाचन हा आपला आवडता छंद जोपासत वेगवेगळ्या साहित्यांचे वाचन करणे आपल्या साहित्याबद्दलच्या व्यासंगी व्यक्तिमत्वाचे दर्शन घडवते.

” सुधीर सरांचे ।
ग्रंथ हेच गुरू ।
वाचन ते सुरू l
नियमित ॥ “

सामाजिक जीवन जगत असताना प्रत्येक व्यक्तींसोबत केवळ निखळ हसून त्यांच्या भावना समजून घेत त्यांच्याशी प्रेमाने बोलून मानवता धर्माला साजेशे वागणेच सर्व सामान्यांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करते.आपल्या अधिनस्थ कर्मचाऱ्यांकडून आपल्या वरिष्ठांना सन्मान प्रत्येक कार्यालयामध्ये बघायला मिळते परंतु सन्मानाबरोबरच सकारात्मक भावनिक ओढ मात्र प्राचार्य सुधीर महाजन यांच्या बद्दल बघावयास मिळते.
एक प्रखर वक्ता,शिक्षणतज्ज्ञ, सकारात्मक नेतृत्व गुण अशा अनेक वैशिष्ठ्यांमुळे सरांचे व्यक्तिमत्व सर्वांसाठी नेहमीच प्रेरणादायी ठरते.प्राचार्य महाजनांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक अशक्यप्राय गोष्टी तेवढ्याच लिलया शक्यप्राय करून दाखविल्या आहेत.त्यांच्या या वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्वाला अधोरेखित करणाऱ्या पुढील ओळी अतिशय समर्पक वाटतात.

“मुश्किलें सफर जानता हू मै,
आगाज से अंजाम जानता हू मै,
मुझको प्यास कि शिद्दत सता नही सकती,
पत्थर निचोडने का हुनर जानता हू मै”

 प्राचार्य महाजन सर नेहमीच विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच उच्च संस्कार देण्यातही आग्रही असतात. त्यांचा विश्वास आहे कि, शिक्षण मुलांना रोजगार मिळवून देऊ शकते परंतु संस्कार त्यांना एक जबाबदार व्यक्ती बनवेल. आदर्श जीवन कसे जगावे हे शिकवेल.जीवनात कितीही संकटं आली तर तो आत्महत्या करणार नाही ही शक्ती संस्कारामुळे असते हे त्यांना माहीत आहे.त्यांच्या या विचारांना अतिशय सहजतेने खालील ओळी स्पष्ट करतात.

“बच्चे इस देश के भविष्य है,
संतुष्ट हू उनके भविष्य मे
कुछ रंग भर रहा हू,
खुशनशीबी है मेरी मै पिढी
निर्माण के लिये काम कर रहा हू”

अशा महान प्राचार्य सुधीर महाजन यांनी आपले आयुष्य शिक्षणक्षेत्राला समर्पित करीत सामाजिक बांधिलकी जोपासत आपल्या विदयार्थ्यांना उद्याच्या नवनवीन आव्हानांसाठी तयार करण्यावर भर देतात. प्राचार्य सुधीर महाजन यांच्या व्यक्तिमत्वाला अतिशय समर्पक भावनांनी पुढील ओळी स्पष्ट करतात.

“सुंदर सुर सजाणे को साज बनाता हू,
नौसिखिये परिंदे को बाज बनाता हू,
चुपचाप सुनता हू शिकायतें सबकी,
तब कही दुनिया बदलणे कि आवाज बनाता हू,
समंदर तो परखता है हौसले कश्तीयो के,
और मै डूबती कश्तीयो को जहाज बनाता हू,
बनायें चाहे चांद पे कोई बुर्ज-ए-खलिफा,
मै तो कच्ची इटो से ही ताज बनाता हू”

महात्मा जोतीराव फुले यांच्या साहित्यबद्दल आपला गाढा अभ्यास आहे.विविध साहित्य सम्मेलनमध्ये आपल्याला फुले- शाहू -आंबेडकर विचार पुष्प प्रस्तुत करण्यासाठी आमंत्रित केले जाते.आपण एक लेखक, कवी तसेच प्रखर वक्ता असल्यामुळे आपले उदबोधन श्रोत्यासाठी एक पर्वनीच असते.

|| प्राचार्य श्री सुधीर महाजन यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा आणि पुढील कार्यासाठी मनस्वी सदिच्छा||

महात्मा फुले राज्यस्तरीय
आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त
अभंगकार – साहित्यिक

✒️प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले(रुक्मिणी नगर,अमरावती)मो:-८०८७७४८६०९