कामे दर्जेदार अन् वेळेत पूर्ण करा, विकासात हातभार लावा

66

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.4जानेवारी):-विधानसभा मतदारसंघास केंद्र व राज्य सरकार यांनी दिलेला यांनी सातत्याने निधी दिला आहे. सोबतच नियोजन, आमदार निधी व अन्य योजनेतून वेळोवेळी सुध्दा निधी प्राप्त होतो आहे. परिणामी, मिळालेल्या त्या भरघोस निधीतून शहरी व ग्रामीण भागात विविध विकासकामे सुरू आहेत. त्यामुळे आपल्या विभागाशी संबंधित विकास कामांच्या प्रक्रियेला गती देवून दर्जेदार, गुणवत्तापूर्ण कामे वेळेत पूर्ण करून विकासात हातभार लावा, अशा सूचना स्थानिक आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.‌

मतदारसंघातील प्रस्तावित विकास कामांचा आढावा घेण्यासाठी शहरातील शासकीय विश्रामगृह येथे सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी यांच्या सोबत आ.डॉ.गुट्टे यांनी बैठक घेतली.

त्यावेळी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी आवश्यक सूचना दिल्या.सध्या सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत सुरू असलेल्या धानोरा काळे, राजूर-वझुर व धारखेड येथील पूलांचे काम कसे सुरू आहे? ते पूर्ण कधी होईल? त्याची सविस्तर माहिती द्यावी. तसेच विकास कामे करताना संबंधित यंत्रणांनी प्रशासकीय समन्वय साधावा असेही आवाहन आ.डॉ.गुट्टे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना केले.या बैठकीस सार्वजनिक बांधकाम विभागाचे सर्व वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी, पदधिकारी व नागरिक उपस्थित होते.