आत्मसन्मानासाठी भीमा कोरेगावची लढाई झाली- प्रो.अनिल काळबांडे

76

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि.6 जानेवारी):-आम्हीही माणसे आहोत आम्हाला माणसासारखे जीवन जगू द्या पेशवाईच्या काळात पशु पेक्षाही पातळीचे जीवन अस्पृश्य लोकांना जगावे लागत होते एक जानेवारी अठराशे अठरा ला भीमा कोरेगाव येथे केवळ मानवतेसाठी समतेसाठी गुलामगिरी नाकारून मानव मुक्तीचे नवे आयाम देण्यासाठी 500 महार सैनिकांनी 28 हजार पेशव्यांची लढाईत पराभूत केले ही लढाईही लढाई आत्मसन्मासनासाठी पेटून असलेल्या शौर्याचे जाज्वल्य प्रतीक असल्याचे प्रतिपादन प्रख्यात आंबेडकरी विचारवंत प्रोफेसर अनिल काळबांडे यांनी केले.

ते भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त तालुक्यातील तरोडा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आयोजित कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अंबादास धुळे हे होते तर कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून विश्वास दामोदर, उत्तम शिंगणकर,संतोष निथळे, प्रज्वल हरणे हे होते.

सुरुवातीला सर्वांच्या उपस्थितीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पूजन करून त्यांना मानवंदना देण्यात आली त्यानंतर गौतम रुखमाजी धुळे यांनी प्रास्ताविकातून या कार्यक्रमाच्या आयोजनामाची भूमिका सांगितली यावेळी विश्वास दामोदर यांनी भीमा कोरेगावच्या इतिहासात ची गौरवगाथा सांगताना ते म्हणाले की पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा नदीच्या काठावर हे ऐतिहासिक लढाई झाली.

1 जानेवारी 1818 रोजी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी व पेशव्यांच्या साम्राज्यविरुद्ध या लढाईत ब्रिटिशाकडून 834 सैनिक होते तर यांचा सेनापती म्हणून कॅप्टन चे नेतृत्व होतंयात बॉम्बे नेटिव्ह लाईट इन्फंट्री तुकडीचे पाचशे महार जातीचे सैनिक ब्रिटिशाकडून यात सामील झाले तर पेशव्यांच्या बाजूने सेनापती पेशवा बाजीराव यांच्या नेतृत्वात ही लढाई लढत होते शेवटी 500 महार सैनिकांच्या पराक्रमा पुढे पेशव्यांना हार पथकावर लावू लागली ची माहिती यावेळी दिली पुढे बोलताना काळबांडे म्हणाले पेशवाईच्या काळामध्ये अस्पृश्य वर फार मोठा अन्याय होत होता त्यांच्या सावलीचा स्पर्श सुद्धा विटाळ मानला जात होता अत्यंत हीन दर्जाची अन मानवी वागणुकीमुळे अस्पृश्य समाज वैतागला होता.

अशाही अवस्थेत त्यांनी पेशव्याकडे आम्हाला माणसासारखं वागवा भेदावर दूर करा व आम्हाला समानतेची वागणूक द्या अशी मागणी केली ती मागणी पेशव्यांनी फेटाळून लावली व त्यांना अपमानित केले त्यामुळे मजबुरीने आत्मसन्मानासाठी ब्रिटिशांच्या बाजूने हे सैनिक पेशव्यांच्या विरोधात लढले पेशवे पराभूत झाले व त्यानंतर पेशवाईचा अस्त झाला या लढाईत वीस महार सैनिक मृत्युमुखी पडले तर तीन सैनिक महार सैनिक जखमी झाले होते त्यांच्या स्मृतिपत्यार्थ ब्रिटिशांनी भीमा कोरेगावला जो शौर्यस्तंभ बनवला त्याच्यासाठी अभिवादन करण्यासाठी शौर्याची प्रेरणा घेण्यासाठी एक जानेवारीला तिथे समाज जात असल्याची माहिती सुद्धा यावेळेस देण्यात आली.

आपल्या अध्यक्ष भाषणात अंबादास धुळे यांनी व्यसन शिक्षण आणि विकास या मुद्द्यावर बोलताना बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे आचरण करा आपल्या आयुष्याचा सोनच होईल असं प्रतिपादन केलं या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शीलवान धुळे तर आभार प्रफुल धुळे यांनी मानले तरी या कार्यक्रमाचे आयोजन गरजे भीम नवयुवक मंडळ तरोडा यांनी केले होते या कार्यक्रमाला असंख्य स्त्री आणि पुरुष उपस्थित होते सोबत फोटो