दहागाव येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी…!

236

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि.4 जानेवारी):-दहागाव येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी…एकीकडे महापुरूषांच्या जयंती निम्मित DJ लावून नाचनाऱ्यांची नवीन पिढी उदयास आली तर एकीकडे महापुरूषांच्या विचारांचे प्रचारक मा. अत्तदिप धुळे प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करीत महापुरूषांच्या, महानायिकांच्या जीवनावर आधारित माहिती विद्यार्थांना, बाल-बालीकांना देत दुसरी पिढी निर्माण करण्यासाठी सतत प्रयत्न करत असतात.

ज्या काळी मुलगी जन्माला येणे हाच गुन्हा समजला जाई त्या काळी मुलींच्या शिक्षणाची ज्योत पेटवणाऱ्या वाघिणीचा जन्म झाला ती म्हणजे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त लहान लहान मुलांमध्ये महापुरुषांचे महानायिकांचे विचार पेरून त्यांना नाचणारी नाही वाचणारी पिढी घडविण्यासाठीच विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले त्यामधे कु. सानिका बारस्कर या विद्यार्थिनीने सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारीत एकपात्री पात्र स्वीकारून त्यांच्या जीवनाची व्यथा मांडली. जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाते उद्धारी. विद्या हाच राष्ट्राचा प्राण, अखंड जीवन व माणूसकीची जिवंत ज्योत आहे.

विद्या हाच सुधारणेचा पाया आहे.आणि विद्ये शिवाय कुठलाही धर्म नाही विद्या हाच सर्वश्रेष्ठ धर्म आहे आणि त्याच पालन करणे हेच सर्वस्व असले पाहिजे अशे सांगत मा. अत्तदिप धुळे यांनी कार्यक्रमाची सांगता केली.

यावेळी सुभद्राबाई मूनेश्वर, रुख्मीनाबाई मुनेश्वर, लक्ष्मीबाई पाईकराव, वर्षाताई कदम, प्रियंकाताई धुळे, स्वातीताई मुनेश्वर, इत्यादी महिलांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविली.