अचानक घरावर दगड पडत असल्यामुळे मसनेरवाडी गावकरी हैरान

202

🔸अंधश्रद्धेच्या प्रश्नावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीची गावाला भेट

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.5जानेवारी):- गंगाखेड तालुक्यातील मसनेरवाडी गावा तील एका कुटुंबावर दिवसभरामधून एकदा तरी दगडं पडत असतांना मसनेरवाडी गावातील सर्व कुटुंब चिंताग्रस्त असल्यामुळे मसनेरवाडी परिस रातील गावात चर्चेला उधाण आले असता मसनेरवाडी गावातील नागरिकांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना फोनवरून संपर्क करताच अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यकारणी सदस्य मा.मुंजाजी कांबळे,गंगाखेड शाखा कार्याध्यक्ष मा.प्रकाश शिंगाडे,पत्रकार राहुल साबणे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन मसनेरवाडी गावातील नागरिकांचे प्रॉब्लेम समजून घेतले.याप्रसंगी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे गंगाखेड शाखा कार्याध्यक्ष मा.प्रकाश शिंगाडे यांनी आपले मनोगत व्यक्त असताना घरावर दगड पडत असलेल्या घरांची पाहणी करून अंधश्रद्धेवर मार्गदर्शन अंधश्रद्धा निर्मूलन समितीची भूमिका विशद केली.

मसनेरवाडी गावातील घरावर पडत असलेले दगड गावातीलच असून ज्यांच्या घरावर दगड पडत आहेत ते कुटुंब अत्यंत चिंताग्रस्त असल्यामुळे गावातील नागरिकही या घराजवळ येऊन दगडा विषयी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करत असत. अचानक पडत असलेल्या दगडावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी समाज प्रबोधन करत काही वेळा पुरता विश्वास जिंकला परंतु यापुढे घरावर दगड पडली तर आणि काय करावे?असा प्रश्न गावकऱ्यांना पडला होता.म सनेरवाडी गावातील गावकरी चिंताग्रस्त असल्यामुळेच आजूबाजूच्या गावातही “दगड पडण्याच्या “चर्चेला उधाण आले होते.