बसस्थानक बांधकाम ठेकेदारास दिला इशारा : प्रत्यक्ष केली पाहाणी

219

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.5जानेवारी):- शहराच्या विकासासाठी राज्य सरकार भरीव निधी देत आहे. मात्र, त्यातून होणारी विकासकामे जर दर्जेदार झाली नाहीत, तर त्या कामांचा काय उपयोग? म्हणून बसस्थानक बांधकामात कसलाही हलगर्जीपणा अजिबात खपवून घेणार नाही, असा सज्जड इशारा गंगाखेड विधानसभेचे आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी संबंधित ठेकेदारास दिला आहे.

शहरात नव्याने सुरू असलेल्या बसस्थानक बांधकामास आ.डॉ.गुट्टे यांनी अचानक भेट देवून प्रत्यक्ष भेट देत कामाची पाहणी केली. तिथे निकृष्ट दर्जाचे काम पाहून संतप्त झाले. त्यावेळी त्यांचा पारा चढला. तेव्हा त्यांनी ठेकेदारास चांगले फैलावर घेतले. तसेच भविष्यात असले प्रकार खपवून घेणार नसल्याचे स्पष्ट म्हटले आहे.

अतिशय काळजीपूर्वक पाठपुरावा करून अंतिम मंजुरी आणलेल्या संबंधित कामाच्या दर्जाबाबत यापुढे सुध्दा कोणतीही सबब ऐकून घेणार नाही, असेही आ.डॉ.गुट्टे साहेब यांनी स्पष्ट केले. यावेळी पत्रकार बांधव उपस्थित होते.